हाय अलर्ट...बंदाेबस्तात...प्रेम...हॅव्ह अ ब्रेक हॅव्ह अ किटकॅट

हाय अलर्ट...बंदाेबस्तात...प्रेम...हॅव्ह अ ब्रेक हॅव्ह अ किटकॅट
Updated on

कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये गेली 40 दिवस दिवसरात्र बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस दांपत्याने आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आपल्या लग्नाचा दहावा वाढदिवस अक्षरशः बंदोबस्तावर असताना एकमेकांना "कॅडबरी' भरवून साजरा करत कोरोना फायटर्स असल्याचे सिद्ध केले आहे. सचिन साळुंखे आणि सपना साळुंखे अशी त्यांची नावे आहेत.
 
साळुंखे दांपत्या 12 वर्षे पोलिस दलामध्ये कार्यरत आहे. सचिन हे कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यातील गुंडविरोधी पथकामध्ये कार्यरत आहेत, तर सपना या शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांना एक पाच वर्षांची सान्वी ही मुलगी आहे. ते दोघेही या "कोरोनाच्या संकटा'मुळे 24 तास बंदोबस्ताचे काम करत आहेत. बंदोबस्तामुळे शहरात विविध ठिकाणी फिरावे लागते. त्यामध्ये आपली मुलगी सफर होऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या मुलीला पाटणला आई- वडिलांकडे ठेवली आहे. हे दांपत्य लॉकडाउनचा बंदोबस्त करत असतानाच त्यांचा लग्नाचा वाढदिवस आला. मात्र, सध्या जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामध्ये हे दांपत्य कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना लग्नाचा वाढदिवस अखेर रस्त्यावरच साजरा करावा लागला.

त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचे समजल्यावर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

वाढदिनी दांपत्याचे आवाहन 

जनतेच्या हितासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे सुख-दुःख बाजूला ठेऊन 24 तास बंदोबस्तासाठी सज्ज आहोत. लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंदोबस्त "अलर्ट' आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पाच वर्षांच्या छोट्या मुलीला आई-वडिलांकडे ठेवले आहे. बंदोबस्तामुळे तिला आम्ही भेटलेलोही नाही. तुमच्यासाठीच आम्ही रस्त्यावर आहोत. मात्र, तुम्ही घरीच राहून पोलिस प्रशासनाला सहकार्य करा, हेच आमचे लग्नाच्या वाढदिवसाचे आवाहन आहे, असे मत सचिन व सपना साळुंखे यांनी व्यक्त केले.

सातारा पालिकेच्या कस्टडीतून बाेकड गेले चाेरीस

Video : जिल्हाधिकारी म्हणाले सातारकरहाे आता वेळ आलीय; पुणे मुंबईकरांनाही इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.