अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...

अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...
Updated on

सातारा : सध्या कोरोना हा आजार फोफावत आहे आणि त्याचा संसर्ग हा वेगवेगळ्या ठिकाणहुन अंत्यसंस्कार आणि सावडणे विधीसाठी येणाऱ्या लोकांच्या संपर्कामुळे होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सातारकरांची काळजी घेण्यासाठी कैलास स्माशनभूमी येथे सर्व व्यक्तींनी मास्क घालणे आवश्यक असून, सॅनिटायझरने किंवा साबणाने हात धुऊनच स्मशानभूमीत प्रवेश करावा. तसेच प्रत्येकात सुरक्षित अंतर ठेवावे अशा स्वरुपाच्या उपाययाेजना आणि नागरीकांची काळजी घेण्यासाठी काही नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती कैलास स्माशनभूमीचे व्यवस्थापन पाहणारे श्री बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चाेरगे यांनी दिली.

चाेरगे म्हणाले कैलास स्मशानभूमीमध्ये मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायला आणताना खालील महत्वाच्या अटींचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नैसर्गिक मृत्यू असेल तर शववाहिनीतुनच  मृतदेह आणावा. जेणेकरुन प्राथमिक नोंद योग्य ठिकाणी होईल. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय किंवा दवाखान्यात मृत्यू झाला असेल तरच मृतदेह दवाखान्यातील मृत्यूचे कारण कळणेसाठी प्रमाणपत्रासह रुग्णावाहिकेतून मृतदेह आणावा.

मृतव्यक्ती मुंबई, पुणे, अथवा अन्य जिल्हा, तालुका येथे मृत झाली असेल आणि ती व्यक्ती स्थानिक सातारा शहराची रहिवाशी असेल आणि संबंधित व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्यासाठी सातारला आणायचा असेल तर सर्व कायदेशीर पूर्तता केल्या शिवाय कैलास स्मशानभूमीत मृतदेह आणू नये असे स्माशनभूमी व्यवस्थापनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
,
ज्या मृत व्यक्तीची कायदेशीर पूर्तता करून मृतदेह स्मशानभूमीत आणताना त्यांच्या बरोबर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेली परजिल्ह्यातील व्यक्तीची नोंद शासनाकडे केलीच पाहिजे याची दक्षता घ्यावी. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणताना आधार कार्ड किंवा इतर रहिवासी पुरावा (झेरॉक्स) आणि फोटो मृतव्यक्ती आणि त्याची माहिती देणारा यांचा आवश्यक आहे. परजिल्ह्यातील, तालुक्यातील व्यक्ती सातारला मृत झाली असेल आणि तिचे अंत्यसंस्कार स्मशानभूमी सातारा येथे आणायचे असेल तर त्या मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करण्सायासाठी प्रशासनाची कायदेशीर मान्यता अंत्यत आवश्यक असल्याचे स्माशनभूमी व्यवस्थापनाने कळविले आहे.

काळजाला भिडतेय स्मशानातील माया

कैलास स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करणेसाठी बरोबर येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमीतकमी पाच व जास्तीत जास्त दहा एवढीच असावी. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क घालणे आवश्यक असून, सॅनिटायझरने किंवा साबणाने हात धुऊनच स्मशानभूमीत प्रवेश करावा. तसेच प्रत्येकात सुरक्षित अंतर ठेवावे. दरम्यान रात्री अकरानंतर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत याची सर्वांनी नाेंद घ्यावी असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

कॉन्स्टेबलच्या पत्राची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

आक्रित घडलं...ती दोन वर्षांनी सापडली

प्रसूतीनंतर ती एकटीच चालत निघाली गावाकडे

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.