Lockdown : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह

Lockdown : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह
Updated on

सातारा : जनतेच्या अडचणी जाणून घेऊन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमधून काही उद्योग, व्यवसायासह शासकीय, खासगी संस्थांना सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (ता. 20) औद्योगिक घटकांसह शेती, बांधकाम, आयटीसह शासकीय कार्यालयांतील कामकाज सुरू होणार आहे. शासकीय कार्यालयांत दहा टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. ही सवलत दिलेली असली, तरी नागरिकांना मात्र, घरातून बाहेर पडता येणार नाही. जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थान कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी या नवीन सवलतींना मान्यता 
देणार का, याची उत्सुकता सातारकरांत आहे. 

सोशल डिस्टन्सिंग पाळून काही उद्योग, व्यवसाय येत्या 20 एप्रिलपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सवलत दिलेली असली, तरी नागरिकांना घराबाहेर मात्र, पडता येणार नाही. तीन मेपर्यंत कोणाला कसलीही गर्दी करता येणार नाही. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच सुविधा देण्याबाबतच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यायचे आहे. 

राज्य शासनाने दिलेल्या सवलतींमध्ये रुग्णालये, संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, औषध दुकाने, वैद्यकीय साहित्य उत्पादन व विक्री केंद्रे सुरू राहणार आहेत, तसेच कृषीसाठी लागणारी साहित्य विक्री व उत्पादन केंद्रांनाही सूट आहे. कृषिमाल खरेदी केंद्रे, मार्केट यार्ड, मासेमारीलाही सूट दिली आहे, तसेच दूध प्रक्रिया केंद्रे, पोल्ट्रीफार्म, हॅचरिज, पशुखाद्य निर्मिती प्रकल्प, गोशाळा, प्राण्याचे शेल्टर होमचाही समावेश केला आहे. 
बॅंकांच्या विविध शाखा, एटीएम, इन्शुरन्स कंपनी, आयआरडीए, सेबी, सहकारी पतसंस्था सोमवारपासून सुरू राहणार आहेत, तसेच अल्पवयीत मुलांची निरीक्षण गृहे, संरक्षण गृहे, निवासी गृहे सुरू राहतील. ज्येष्ठ नागरिक, विधवा, स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती योजनांमधील निधीचे वाटप, निवृत्ती वेतन, प्रॉव्हिडंटविषयक सेवा सुरू होणार आहेत. बालकांना पोषण आहाराचा घरपोच पुरवठा केला जाणार आहे. शैक्षणिक संस्थांनी आपले कामे ऑनलाइन पद्धतीने करणे अपेक्षित आहे.
 
सोशल डिस्टन्सिंग पाळून रोजगार हमीची काम सुरू होणार आहेत. इंधन आणि गॅस साठवणूक व विक्री सुरू राहणार आहे. टपाल सेवा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा, वीज निर्मिती आणि वितरण सुरू होणार आहे. दुष्काळ व टंचाई निवारणाची कामे सुरू करता येणार असून, टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासही परवानगी दिली आहे. राज्यात व आंतरराज्यीय वस्तू व मालांची ने आण करता येणार असून, माल वाहतूक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे, तसेच ट्रक दुरुस्तीच्या दुकानांसह महामार्गावरील ढाबे सुरू होणार आहेत. वृक्षारोपणाच्या कामांसह पॅकेजिंग, विक्री व मार्केटिंगची कामे 50 टक्के मजुरांच्या माध्यमातून सुरू करता येणार आहेत. 

...या व्यवसायांना सवलत 

केबल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमे, 50 टक्के कर्मचाऱ्यांसह आयटी व संबंधित सेवा, डेटा सेंटर्स, कॉल सेंटर्स, शासनमान्य सेवा केंद्रे व ई कॉमर्स, कुरिअर सेवा, कोल्ड स्टोअरेज, गोडाऊन, लॉकडाउनमध्ये अडकलेल्या पर्यटक व नागरिकांची राहण्याची व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज, स्टे होमचा समावेश आहे. रेस्टॉरंटमधून घरपोच सेवा देता येणार आहे; पण त्यासाठी मास्क लावणे बंधनकारक असून, किचनमध्ये काम करणाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. फरसाण निर्मिती व मिठाईची दुकाने यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह 

जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने 20 एप्रिलपासून काही सेवांना "लॉकडाउन'मधून सूट दिली आहे. सातारा जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे आम्ही तयार केली आहे. ती आम्ही जाहीर करणार आहोत. जनतेने प्रशासनास सहकार्य करावे.'' 
 

कामगारांची राहण्याची सोय करावी लागेल 

उद्योगांमध्ये ग्रामीण भागातील उद्योग सुरू करता येणार आहेत. त्यासाठी उद्योगांना आपल्या कामगारांना कारखान्यातील किंवा कंपनीच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करावी लागणार आहे, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळून कामगारांची वाहतूक करावी लागेल. जीवनाश्‍यक वस्तू, औषधे, वैद्यकीय उपकरणे, कच्चा माल निर्मिती करणाऱ्या उद्योगांना सवलत दिली आहे. आयटी हार्डवेअर, पॅकेजिंग उद्योग, ग्रामीण भागातील वीटभट्टी उद्योग, गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्य तेलाशी संबंधित लघू व मध्यम उद्योगांचा समावेश आहे.

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...

Video : आई तुझ लेकरु...मन हेलावणारी ही बातमी वाचाच 

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.