Video : देवा सारखी माणसे मला भेटली

Video : देवा सारखी माणसे मला भेटली
Updated on

ढेबेवाडी (जि.सातारा) : एकीकडे लॉकडाउनमुळे विस्कळित झालेले फळे व भाजीपाला मार्केट आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची डोक्‍यावरील टांगती तलवार, अशा स्थितीत काढणी करून शेतात पडून असलेल्या तब्बल 55 टन कलिंगडांकडे हताशपणे बघत रडत बसण्याऐवजी त्यांची घरोघरी विक्री करून मानेगाव (ता.पाटण) येथील शेतकरी अधिकराव माने यांनी बंदीतही संधी शोधली.
 
शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे प्रगतशील शेतकरी म्हणून मानेगावचे माने यांची पाटण तालुक्‍यात ओळख आहे.1992 पासून आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याच्या पाठबळावर ते शेतीत कार्यरत आहेत. श्री. माने यांनी दहा फेब्रुवारीला दीड एकरात कलिंगड लागवड केली. 55 दिवसांत हातात येणारे हे पीक असून, मल्चिंग, रोपे खरेदी, ठिबक सिंचन, मशागत, खते, फवारण्या आदींवर त्यांनी एक लाख 17 हजार खर्च केला. साधारणपणे साडेचार लाखांचे उत्पन्न सहज मिळेल, असा त्यांना विश्वास होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कलिंगडांची काढणी केली. 55 टन माल निघाला.

परंतु, लॉकडाउनमुळे बाजार ठप्प असल्याने तो विकायचा कसा, असा प्रश्न अन्य शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्यासमोरही उभा ठाकला. काढणी केल्यानंतर साधारणपणे 15 दिवस कलिंगडे टिकतात. श्री. माने यांनी मोबाईलव्दारे गावोगावी संपर्क साधून विक्री व्यवस्था उभारली. अनेक फिरत्या विक्रेत्यांनी शेतात येऊन कलिंगडांची खरेदी केली. त्याशिवाय स्वतः श्री. माने यांनी भाऊ सुभाष आणि काही मजुरांच्या मदतीने कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांतील गावोगावी, घरोघरी जावून वजनानुसार दहा ते सव्वाशे रुपयांस एक याप्रमाणे कलिंगडे विकली. 

Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात

Coronavirus - चीनचा कट्टर विरोधक तैवानने कोरोनालाही हरविले...वाचून थक्क व्हाल - 
 


""चोहोबाजूचे मार्ग खुंटलेले असतानाही हताश झालो नाही. तब्बल 55 टन कलिंगडे 15 दिवसांत विकली. कितीही मोठ्या अडचणी असल्या तरीही जिद्द व आत्मविश्वासाने त्यातून मार्ग निघतोच, हा माझा अनुभव आहे.'' 
अधिकराव माने, प्रगतशील शेतकरी 



 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.