आक्रित घडलं..."ती' दोन वर्षांनी सापडली

आक्रित घडलं..."ती' दोन वर्षांनी सापडली
Updated on

तरडगाव (जि. सातारा) : "ती' दोन वर्षांपूर्वी हरवली होती. खूप शोधली; पण "ती' सापडली नाही. त्यांनी तिची आशा सोडली होती. मात्र, आकरित झाले. तब्बल दोन वर्षांनी ती अलगद हाती लागली. हो..ज्या शेतात भुईमुगाच्या शेंगा काढताना पडली होती. तेथेच आज ती सोन्याची अंगठी सापडली. धरणी मातेने जपून ठेवत कष्टाचा ऐवज अलगद परत दिला.
 
तरडगाव येथील अशोक चव्हाण यांच्या शेतातील भुईमूग खाण्यासाठी त्यांचे फलटण येथील मित्र राजकुमार पवार व त्यांची पत्नी दोन वर्षांपूर्वी (2018) मे महिन्याच्या सुटीमध्ये गेले होते. भुईमूग उपटत असताना पवार यांची सोन्याची अंगठी शेतात पडली. त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर अंगठीची बरीच शोधाशोध केली, तरीही ती काही सापडली नाही. दरम्यान, चव्हाण यांनी त्या शेताची दोन वेळा नांगरट करून जवळपास पाच पिके घेतली. या वर्षी त्याच शेतात चव्हाण यांनी भुईमूग लावला होता. ते भुईमूग उपटताना भुईमुगाच्या डहाळ्याबरोबर सोन्याची अंगठी बरोबर आली. त्यांना दोन वर्षांपूर्वी पवार यांची अंगठी शेतात पडल्याची आठवण झाली. त्यानंतर राजाराम चोरगे व अशोक चव्हाण यांनी लगेच पवार यांच्याशी संपर्क साधून अंगठी सापडल्याचे कळविले.
 
पवार खूप भारावले. ते म्हणाले, ""येथे ना किंमत पैशाला, ना किंमत सोन्याच्या अंगठीला आहे. ती किंमत फक्त प्रामाणिकपणाला आहे. मी फलटणला असताना त्यांनी फोन करून मला अंगठी सापडल्याची माहिती दिली. खरच अशी अनेक प्रामाणिक माणसे आजही आहेत.'' 

खबरदारीचा उपाय म्हणून त्रिपुटी, भिवडी, जांब बुद्रुक ही तीन गावे सील केली आहेत 

...त्यांची घरवापसी, गावागावांत धास्ती?

हुशश ! महाबळेश्वर आजही काेराेनामुक्तच; कैदी सुरक्षित स्थळी नेले

मंगळवार पेठेतील बाधीत ठरलेली महिला शहरातील तीसहून अधिक घरात दूधाचा रतीब घालण्यासाठी जात होती. त्यामुळे प्रशासनाची काळजी अधिक गडद झाली आहे. त्यातच तिला रुग्णालयात चालवत नेल्याने नागरीकांमध्ये धडकी भरली आहे

...म्हणून दुपारी तीनला पश्चिम महाराष्ट्र हादरला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()