कऱ्हाड ः लोकांच्या सेवेसाठी तब्बल 24 तास बंदोबस्त, ना एसी, ना फॅन दिवसभर उन्हात तळायचे, दिवसभर ड्युटी करून लोकांना तोंड देऊन-देऊन दमून घरी गेल्यावर ना आई-वडिलांची, ना मुलांची भेट, घरातले असूनही परक्यासारखे वेगळ्या खोलीत राहायचे, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, ओसरीवर बसून जेवायचे, तर दुसरीकडे आपल्यामुळे कुटुंब बाधित होऊ नये, या भीतीने गावी सोडलेल्या पत्नी, मुलांपासून दूर राहून पावणेदोन महिने भेटीविनाच दिवस काढायचे. अशा वाईट स्थितीत एक ना दोन तब्बल 50 दिवस जिगरबाज पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागे न हटता स्वतःचा जीव धोक्यात घालून आबालवृद्धांच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी रस्त्यावर काढलेत.
कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी आणि लोकांना घरी बसवून त्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर तब्बल 24 तास पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून ऐन उन्हाळ्यातील उन्हात हे पोलिस दादा एसी, फॅन शिवाय दिवसभर उन्हात ताटकळत उभे होते. बंदोबस्त करताना वाहनधारकांना अडवल्यावर त्यांना अनेकदा तोंड द्यावे लागायचे, त्यांना समजून सांगायला लागायचे. त्यातच बंदोबस्ताचाही ताण असायचा. एवढे करून दमून घरी गेल्यावर आपल्यामुळे कुटुंबीयांना कोरोना होईल, या भीतीने आई-वडिलांची आणि मुलांची भेटच होत नव्हती. त्यांना दुरूनच बघून समाधान मानायला लागायचे. त्यामुळे पोलिसांना स्वतःच्या घरात परक्यासारखे वेगळ्या खोलीत राहायला लागायचे. स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, ओसरीवर बसून जेवायला लागायचे. अशा परिस्थिती त्यांनी 50 दिवस काढले.
त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांनी जनतेशी दररोजचा संपर्क येत असल्याने कोरोनाचे संकट आपल्या घरात कधी पोचेल हे सांगता येत नाही, या भीतीने पत्नी, मुलांना गावी सोडले आहे. त्या वेळपासून त्यांना सुटीच नसल्याने आणि कोरोनाच्या धास्तीने मनही त्यांना भेटायला जायला तयार नसल्याने त्यांनी त्यांच्यापासून स्वतःला आजखेर तब्बल पावणेदोन महिने दूर ठेवले आहे. केवळ व्हीडीओ कॉलिंगवरून त्यांचे तोंड बघून समाधान मानायचे. मुलांनी भेटण्यासाठी रडून केलेल्या विनवण्या ऐकून डोळ्याच्या कडा ओल्या होत असतानाच ड्युटीचे भान ठेऊन पुन्हा बंदोबस्तासाठी सज्ज व्हायचे, अशा विदारक स्थितीत तब्बल 50 दिवस पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर काढले आहेत. तेही केवळ आबालवृद्धांच्या सुरक्षेसाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठीच. शासनाने सुक्ष्म कंटेनमेंट झोन केल्यामुळे आता बंदोबस्ताचा थोडा ताण कमी झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील भार कमी झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
आई-वडीलही बंदोबस्तावर
आई-वडील दोघेही पोलिस दलात कार्यरत असलेले दांपत्य आहेत. त्यांनाही या लॉकडाउनच्या काळात रस्त्यावरच बंदोबस्त करावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या चिमुरड्यांची आणि त्यांची 50 दिवसांत भेटच झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या रडण्याच्या टाहोनी मन सुन्न होऊनही त्यांना बंदोबस्त करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.
केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी
मस्तच : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आज 15 जण काेराेनामुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.