कऱ्हाड ः शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या शहर, मलाकपूरसह त्या भागातील ग्रामीण भागात घरपोच दूध वितरण व्यवस्था उद्यापासून (शनिवारपासून) सुरू होणार आहे. सकाळी सहा ते आठ व सायंकाळी सहा ते आठ वेळत कोयना दूधातर्फे नेमलेल्या 47 दूध वितरकांकडून घरपोच दूध दिले जाणार आहे. त्यासाठी त्या दूध वितरकांच्या मोबाईलवर आपली मागणी नागरीकांनी कळवायची आहे. त्यानंतर तो दूध वितरक तुम्हाला घरपोच दूध देणार आहे. त्याची महत्वाची बैठक प्रातांधिकारी उत्तम दीघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या व कोयना दूध संघाचे कार्याकारी संचालक अमाेल गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात तो निर्णय झाला.
लॉकडाऊननंतर शहर व पसिरसात दूध वितरणाची मागणी होत होती. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर त्याचा निर्णय होणे गरजेचे होती. ती गरज आेळखून दूध वितरणाबाबत कोयना दूध संघाने पुढाकार घेतल्याने शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या भागात दूधाची निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्या (शनिवारपासून) शंभर टक्के लॉकडाऊन झालेल्या भागात सकाळी व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत घरपोच दूध सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने वितरकांची नावे, त्यांचा मोबाईल नंबरही जाहीर केला आहे.
कोयना उपलब्ध असणार दूध -
(अनुक्रमे वितरकांचे नाव, मोबाईल क्रमांक) ः
कऱ्हाड ः आयाज मुल्ला (७०५८३७१७८६), रुबीना मुतवल्ली (८९५६६०५६०८), जनार्दन मोरे (९८६०१२८८७१), उमेश मोरे (९६५७७११३८२), लियाकत मुल्ला (७०५७२८७५८०), संभाजी यादव (०२१६४-२२११०३), शरद सगरे (९९२१०२७६०४), लालासाहेब भिसे (९४०३३४७४२५), शाहरुख मुल्ला (९८३४५५२२०६), मंदार हेंगाणा (९१७५२२५५७८), मंगेश पत्की (९८९०४६९४६९), रणजीत सगरे (९९०९०५५५५७), मधुर एजन्सी (८९७५५२४५४३), महेश बरिदे (७३८५७४९१७७), वैभव देवळे (९०२८८५८६२४), आनंदा काटकर (९९७५२१६०९९), सुधीर भांबुरे (७०२००३८४१६), पंकज कुलकर्णी (७८२३००१३९५), रमेश साळुंखे (९६६५१५२९००), विजयसिंह देसाई (५१५८२९७४९०), सुनिता शिंदे (९९२३१७७६७३), प्रदिप पारवे (८६२४८६८२८५), अथर्व एजन्सी (९१७५०२१०६४), दत्तात्रय काटे (९१५८५७७७६२), दिपक पाटील (९६०७२९९६६६), विकास शिंदे (९९६०४५६२२७), महादेव हांगे (७०३८७६८१०९), जफर नायकवडी (९७३०४०५५५३).
मलकापूर - अनुसया साळुंखे (९८२२९७७३५०), सुरेश चांदे (८३०८१८३८६६), जोतिराम चोरगे (७५१७४५१३८७), उत्सव बेकरी (९९७०००५१६०), विनायक कुलकर्णी (९४२३८६८१०९), सुरेश पाटील (७७९८९२८१४७), संतोष फुके (९३२५३८३८४१), भानुदास साळुंखे (९८६०००३९५९), मोहन पाटील (९०९६१४९९८५), संकेत सेल्स (९९७०३४१०७९).
ओगलेवाडी ः अक्षय पवार (८३०८०३९०४२), शिव शॉपी (७२१९१५४३३३), सलीम मुजावर (८७६६८०३२३४),
सैदापूर ः रुपेश शाळगावकर (८६५६९४६९७४), सुरेंद्र व्होवाळ (९०९६५४३४१५).
वारुंजी ः वैभव धुमाळ (८७६६८४१४१३), गोटे ः शौकत आगा (९४२२५९२३२५)
हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु
Coronavirus : कऱ्हाडात कशामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले वाचा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.