कोरोनाच्या महामारीत माणुसकीही थांबली!

madat
madat
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) ः कोरोनामुळे माणुसकी आटल्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. त्याचा प्रत्यय आज येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांना अनुभवायला मिळाला. कोणीही मदतीला पुढे येत नसल्याने अखेर प्रा. सकटेंनी मोटारसायकलवरून संबंधित महिलेला घरी पोचवले. 
काल (ता. 25) सकाळी साडेसातला मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्यानंतर रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी प्रा. सकटे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आणखी काहींना जमाही केले. मात्र, कोरोनाच्या धास्तीने कोणीही मदतीसाठी पुढे येण्यास धजावले नाही. त्यामुळे प्रा. सकटे यांनी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवत संबंधित महिलेला स्वतःच्या मोटारसायकलवरून तिच्या राहत्या घरी पोचवून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. कोरोनाच्या काळातही त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होत आहे. प्रा. डॉ. सकटे येथील विद्यानगरमध्ये वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ते बाहेर पडले. शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयापासून ते बनवडी फाट्यावरील उंडाळकर वसतिगृहाकडे गेले. त्यावेळी वसतिगृहासमोर एक महिला चक्कर येऊन रस्त्यात पडली. प्रा. डॉ. सकटे यांनी प्रसंगावधान राखत लोकांना हाक मारून गोळा करण्याचा प्रयत्न केला. लोकही जमा झाले. मात्र, कोरोनाच्या धास्तीने कोणीही मदतीसाठी पुढे येईना. त्यामुळे प्रा. डॉ. सकटे यांनी माणुसकी दाखवत एकटेच त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे सरसावले. काही वेळात महिला शुध्दीवर आली. तिने शहरातील वाखाण भागात राहत असल्याचे सांगितले. त्यावर प्रा. डॉ. सकटे यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनधारकही थांबण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रा. डॉ. सकटे यांनी तातडीने घर गाठून स्वतःची मोटारसायकल घेऊन पुन्हा उंडाळकर वसतिगृहासमोर आले. या सुमारे 15 मिनिटांच्या कालावधीत संबंधित महिला रस्त्याकडेला एकटीच पडली होती. मात्र, मदतीसाठी कोणीही पुढे जाण्यास धजावत नव्हते. अखेर प्रा. डॉ. सकटेंनी संबंधित महिलेला उचलून मोटारसायकलवर बसवले. यावेळी बघ्याच्या गर्दीतून काही जण "तिला सरळ बसवा', अशा लांबूनच सूचना करत होते. मात्र, मदतीसाठी पुढे कोणीही येत नव्हते. संबंधित महिलेच्या घरी नेवून प्रा. डॉ. सकटे यांनी तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यावेळी कुटुंबीयांनी प्रा. सकटेंचे आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.