बिअर दाेन हजारांची फाेडणी आठ लाखांची

बिअर दाेन हजारांची फाेडणी आठ लाखांची
Updated on

ढेबेवाडी (जि.सातारा) : गावाकडची दारू दुकाने बंद असल्याने बिअर आणायला सांगली जिल्ह्यात गेलेल्या ढेबेवाडी विभागातील तळीरामांना रात्री पुन्हा बिअरऐवजी पोलिस कारवाईचा प्रसाद मिळाला. बारा बिअरसाठी त्यांची आठ लाखांची गाडी तर जप्त झालीच शिवाय पाच जणांवर गुन्हाही दाखल झाल्याने त्यांना बाटली चांगलीच महागात पडल्याची चर्चा येथे होती.
 
लॉकडाउनच्या काळात बंद करण्यात आलेली परवाना प्राप्त दारूची दुकाने आता हळूहळू उघडायला सुरुवात झाली असली, तरी सातारा जिल्ह्यातील तळीरामांच्या पदरात अजून तरी निराशाच आहे. आजूबाजूच्या अन्य जिल्ह्यांतील दारू दुकाने सुरू झालेली असली, तरी सातारा जिल्ह्यातील दुकानांना लावलेली सील निघायची चिन्हे नसल्याने ढेबेवाडी खोऱ्यातील तळीराम अस्वस्थ झाले आहेत. दोन नंबरने दुप्पट-तिप्पट किमतीने दारू खरेदी करणे परवडत नसल्याने त्यांनी दोन दिवसांपासून तडक जवळच्या सांगली जिल्ह्यातील दारू दुकाने असलेली गावे गाठायला सुरुवात केली आहे. ढेबेवाडीपासून सुमारे 20 किलोमीटरवर सांगली जिल्ह्याची हद्द आहे. या परिसरातील तळीराम आणि चोरटी दारूविक्री करणारे काळगावमार्गे शिराळा तालुक्‍यात जाऊन दारू खरेदी करत असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 

येथील पोलिसांनी वारंवार केलेल्या कारवाईतूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. आता सांगली जिल्ह्यात दारू दुकाने उघडल्याने ढेबेवाडी विभागातील मद्यपींचा तिकडे लोंढा सुरू झाला आहे. तेथून काळगावच्या डोंगरमार्गे कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत देशी-विदेशी दारूचा सप्लाय सुरू असल्याचीही चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. काल रात्रीही काळगावच्या लोटळेवाडी बाजूकडून आलेली मोटार पोलिसांनी अडवून तपासणी केली असता त्यात बिअरच्या बारा बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत एक हजार 980 रुपयांची बिअर आणि आठ लाखांची मोटार असा मुद्देमाल जप्त करत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण, अशोक खवळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या परिसरातील अनेक जण दारू आणण्यासाठी डोंगरमार्गे सांगली जिल्ह्यात ये- जा करत असल्याचा संशय असल्याने पेट्रोलिंग वाढविल्याचे श्री. भजनावळे यांनी सांगितले. 


दुकानांची तपासणी करा 

लॉकडाउनच्या काळात दारू दुकाने, बिअर बार, परमीट रूम बंद असतानाही ढेबेवाडी भागात अनेक गावांत दारू मिळत होती. पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकून मुद्देमालही जप्त केला. सापडलेली दारू सांगली जिल्ह्यातून येथे आली होती, अशी माहिती तपासातून समोर आलेली असली, तरी काही सीलबंद असलेल्या दारू दुकानातील बाटल्यांनाही बंद काळात पाय फुटल्याची जोरदार चर्चा येथे आहे. दारू दुकानांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर उत्पादन शुल्कसह प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानांचे सील काढून कसून तपासणी केल्यास गंभीर प्रकारही समोर येऊ शकतो, अशी येथे चर्चा आहे.

पक्षी निरीक्षणार्थ रानोमाळ भटकंती

कऱ्हाड : एका क्लिकवर मिळवा किराणा माल घरपाेच

धक्कादायक दूध विक्रेत्या कोरोनाबाधीतेस चक्क शहरातून चालवत नेले

कामगिरी फत्ते : घरापर्यंत काेट्यावधी रुपये पाेचले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.