कऱ्हाड : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे राज्यातील परप्रांतीय मजूर, कामगार गावी परतले आहेत. त्यामुळे सद्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना मनुष्यबळाची चणचण भासू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आयटीआयच्या शिक्षित स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात आयटीआयच्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार भरती झाल्यास सुमारे चार हजार स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीच्या संधी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात व राज्यात कोरोनाचे संकट गेल्या दोन महिन्यापासून घोंगावत आहे. त्याच्या भितीमुळे अनेक परप्रांतियांनी महाराष्ट्रात न थांबता स्वतःच्या जन्मभूमीकडे धाव घेतली आहे. उत्तरप्रेदश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आदी राज्यातील परप्रांतीय गावाकडे रवाना झाले. त्यामुळे गेले अनेक वर्ष येथील एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांच्या जाण्यामुळे उद्योग-व्यवसायात मनुष्यबळाची चणचण भासू लागली आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळून उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे उद्योग सुरू करण्याच्या उद्योजक तयारीत आहेत. मात्र कामगारांची अडचण जाणवू लागली आहे. त्यासाठी पर्याय म्हणून जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थातून (आयटीआय) बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना या उद्योगांमध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने सध्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय एक यानुसार अकरा शासकीय आयटीआय तर सहा खासगी आयटीआय आहेत. पाटण, कऱ्हाड व फलटण येथे ते आहे. दरवर्षी सुमारे साडे चार हजार विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. तर सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिकून बाहेर पडतात. आज आखेर प्रशिक्षण घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. त्यातील काहीजण पुण्या- मुंबईत नोकरी करत आहेत. काहींनी स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू केला आहे. काहीजण अद्यापही बेरोजगार आहेत. यानिमित्ताने त्यांनाही कामाची संधी उपलब्ध होत आहे. त्यादृष्टीने आयटीआयने बेरोजगार विद्यार्थ्यांची यादी ही तयार केल्याचे समजते. संस्थांनी याबाबत संकेतस्थळावरून ज्यांना मनुष्यबळ आवश्यक आहे, त्यांनी त्या संकेतस्थळांवर संपर्क साधून मागणी केल्यास त्यानुसार कामगार पुरवण्याचे काम केले जाणार आहे. कऱ्हाडच्या एमआयडीसीतील सुमारे दोन हजारांहून अधिक परप्रांतीय कामगार त्यांच्या गावी परतले आहेत. त्यामुळे या एमआयडीसीत सुमारे दोन हजार कामगारांची आवश्यकता भासणार असल्याचे दिसून येते. येथे उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी हे कामगार तातडीने हवे आहेत. त्याबाबत कौशल्य व विकास उद्योजकता विकास विभागातील अधिकाऱ्यांशी एमआयडीसीतील उद्योजकांनी संपर्कही साधला आहे. त्यानुसार त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले. एमआयडीसीत प्रामुख्याने टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट व इलेक्ट्रिशियन या ट्रेडचे कामगारांची आवश्यकता असते.
ती येथे मिळण्यास मदत होईल.
पुण्याचे आकर्षण...
सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील आयटीआयधारकांची पुणे, पिंपरी चिंचवड मधील कंपन्यात नोकरीला सर्वाधिक पसंती असते. तेथील राहणीमान, जीवनशैली याचे त्यांना आकर्षण असते. त्या कंपन्यांत मिळणारा पगारही त्या तुलनेत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये काम करायचे झाल्यास पुण्याच्या तुलनेत कमी पगार मिळत असल्याने अनेक जण येथे काम करण्यास अनुत्सुक असतात. मात्र कोरोनाचे आलेले संकटाचे संधीत रूपांतरीत करण्याची सध्या आयटीआयधारकांना मिळाली आहे. त्यामुळे त्यास कसा प्रतिसाद मिळणार ? याकडे लक्ष लागून आहे.
कऱ्हाडकरांसाठी गुड न्यूज; पालिकेच्या पुढाकाराचा झाला गवगवा
"कोरोनाच्या भितीने परप्रांतीय कामगार गेल्याने सर्वच उद्योगांना कामगारांची कमतरता भासू लागली आहे. सध्या शिथीलता मिळून उद्योग सुरू करण्यास परवानगी असली तरी मनुष्यबळाची अडचण आहे. त्यासाठी आयटीआयमधील विद्यार्थ्यांना यानिमित्ताने संधी आहे. यासंदर्भात कोल्हापूर येथील कौशल्ये रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांच्याशी सपंर्क साधला आहे. त्यांच्याकडून कुशल कामगार देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे".
जितेंद्र जाधव, अध्यक्ष - कऱ्हाड इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.
"जिल्ह्यात दरवर्षी सुमारे अडीच हजार विद्यार्थी आयटीआयतून कौशल्यपूर्ण शिक्षण घेवून बाहेर पडतात. अनेकांची महास्वयंमवर नोंदणी आहे. त्यामुळे सध्या उद्योगांसाठी कामगारांची आवश्यकता असल्यास स्वयंरोजगारद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. तसेच कंपन्यांनी संपर्क साधल्यास आयटीआयमधून थेट प्रिशिक्षण घेवून बाहेर पडलेल्यांची यादी, संपर्क क्रमांक देवून कामगार भरतीसाठी सहकार्य करता येईल".
सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सातारा.
सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...
म्हाते खुर्द : अखेर अर्णवच्या मृत्यूचे कारण सहायक पोलिस निरीक्षकांनी कळविले
प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज; वेळापत्रक जाहीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.