तारळे (जि.सातारा) : तारळे विभागाला वादळी वारे व पावसाने झोडपून काढले. यात तारळे भागाला वीज पुरवठा करणारी मेन लाईन तुटून वीज खंडित झाली होती. सुमारे चार तास व सात किलोमीटर चिखल तुडवत येथील वायरमनच्या टीमने रात्रीच्या अंधारात बिघाड शोधून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या मेहनतीचे कौतुक होत आहे.
वादळी पावसात तारळे विभागातील सुमारे ४० हुन अधिक गावांना वीज पुरवठा करणारी 33 केव्ही दाबाची मुख्य वाहिनी तुटल्याने तारळे सह सर्व विभाग अंधारात गेला होता. रानात झालेला चिखल व अंधारामुळे बिघाड सापडत नव्हता. येथील वायरमननी चिखल तुडवत (चिखलात एकेक पाऊल उचलणे जिकिरीचे ठरत) होते. सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सात किलोमीटर लाईन पेट्रोलिंग केले. अखेरीस सावरघर शेजारी मेन लाईन तुटल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी अकरा वाजता केवळ बॅटरीच्या उजेडात विजेच्या डांबावर चढून तुटलेली वायर जोडण्याचे दिव्य येथील टीमने पार पाडीत रात्री साडे अकराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना सुखद धक्का दिला.
वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. वीज वीज वितरण कंपनी मध्ये कामगारांचा तुटवडा आहे. डोंगरी भागात काम करताना त्यांना समस्यांचा डोंगर पार करावा लागतो. चोवीस तास तैनात असणाऱ्या वायरमनवर अलीकडे वीज बिल वसुलीचा देखील अनावश्यक ताण वाढविला आहे. अत्यंत धोकादायक स्थितीत काम करून देखील तुलनेने कमी पगारात समाधान मानावे लागते. अशात ते नेहमी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत असतात. रात्री अपरात्री ते कामासाठी धावपळ करीत असतात याची अनेक उदाहरणे आहेत. कालच्या प्रसंगाने ते पुन्हा एकदा दाखवून दिले.
लोक घरात थांबण्यासाठी अखंडितपणे वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कर्मचारी वर्गाचं सुद्धा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, आरोग्य, महसूल, सफाई कर्मचारी यांच्या बरोबरीने महावितरणच्या कर्मचारी वर्गाचं सुद्धा कौतुक होणं गरजेचं आहे. सहाय्यक अभियंता श्री. पाटसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईनमन श्री. बनकर, वायरमन बाळकृष्ण मोहिते, संजय वळवी, संजय तडवी, उमेश कदम, रफिक नदाफ, शकील मणेर, श्री. भंडारे, ओंकार माळी, शरीफ तडवी, नितेश जाधव, पी.सी. थॉमस, ऑपरेटर यादव आदींनी रात्रीच्या अंधारात काम करून वीज पुरवठा सुरळीत केला. या सर्वांचे कौतुक करण्यात येत आहे.
कोरोनाच्या लढाईत विविध घटक फ्रंट फुटवर आहेत. ई - सकाळच्या वाचकांसाठी आम्ही खास काही प्रेरणादायी बातम्या घेऊन आलाे आहाेत. त्या सविस्तर वाचा
Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.