तारळे ः येथे गाडी सर्व्हिसिंग व खरेदीसाठी मेंढोशी (ता. पाटण) येथील बापूराव जाधव पिकअप जीप घेऊन आले होते. ती त्यांनी भीमाच्या पुलाजवळ लावली होती. उतरताना त्यांच्याकडून जीपलाच चावी राहिली. त्यानंतर सर्व कामे उरकून ते परतल्यावर त्यांना जीप दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत थेट पोलिसात धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जीपचा शोध घेतला.
याबाबत माहिती अशी, की श्री. जाधव यांनी चौकीतील हवालादार अमोल खवळे यांना कैफियत सांगितली. माहिती घेऊन त्यांनी येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता, जीप नागठाण्याकडे गेल्याचे लक्षात आले. शिवाय काही जणांनीही त्या बाजूला जीप गेल्याचे सांगितले. श्री. खवळे यांनी बोरगाव पोलिसांना नागठाणे येथे नाकाबंदी करण्यास विनंती केली. त्या वेळी तेथे जीप मिळून आली. मग जीप घेऊन ते तारळे येथे आले. जीप पळविणारी व्यक्ती पाल येथील मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. मालकानेही कोणतीही तक्रार न दिल्याने त्या मनोरुग्णाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, अवघ्या दोन तासांत कौशल्य पणाला लावत श्री. खवळे यांनी जीपचा शोध घेतला. त्यामुळे श्री. जाधव यांचाही जीव भांड्यात पडला. त्यांनी पोलिसांच्या तत्पर कृतीचे कौतुक करून आभार मानले. उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक मोहन तलवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
अनर्थ टळला..
काही वर्षांपूर्वी पुण्यामध्येही मनोरुग्ण संतोष माने याने एसटी पळवून ती भरधावपणे रस्त्यावर चालवत अपघात घडविले होते. त्यात काहींना जीवही गमवावा लागला होता. सुदैवाने या घटनेत तसे काहीही घडले नाही. पळवलेली जीपही सुस्थितीत होती. मात्र मोठा अनर्थ टळल्याची भावना या वेळी अमोल खवळे यांनी बोलून दाखविली.
50 कुटुंबांना मदत करुन नव दांपत्य संसार वेलीवर
गावात काेणीही उपाशी राहू नये, यासाठी गुढेकरांचा मायेचा हात
साताराः वणवे कमी झाल्याने ऐन उन्हाळ्यात डोंगर हिरवेगार
बत्तासभाऊ लई झ्याक... सांगा समद्यास्नी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.