फलटण शहर : लोकअदालत निमित्त फलटण शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मुख्य न्यायाधीश सौ. एस. व्ही निकम, आय.एम. नायकवडी, एस.एम. बोहरा, तहसीलदार विजय पाटील, फलटण वकील संघाचे अध्यक्ष आर.वाय. कदम, उपाध्यक्ष एस. भोंगळे, माजी अध्यक्ष जावेद मेटकरी यांचेसह सर्व बार सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.
शहरातून काढलेल्या जागृती रॅलीमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीतील लोकांना मोफत सेवा, अवैध मानवी व्यापारातील बळी किंवा भिकारी यांना मोफत सेवा, वादपूर्व प्रकरणांमध्ये घडवून आणता येतो. अपंग, असमर्थ, अंध व्यक्तींना मोफत सेवा, तसेच "भांडणापेक्षा तोडगा बरा, मिळेल त्यातच आनंद खरा," अशा आशयाच्या फलकांसह घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी तालुका विधि सेवा समितीच्या वतीने आयोजित हितगुजमध्ये फलटण मुख्य कोर्ट न्यायाधिश एस. व्ही. निकम यांनी जनजागृती मोहीमेचा उद्देश स्पष्ट केला. वकिलांमुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे शक्य झाले असून त्याचा फायदा सर्वांना होईल. ग्रामीण भागात सर्वांधिक जनजागृतीची गरज असून पुढील टप्प्यात तसे नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सुचित केले. यावेळी न्यायाधिश एस.एम.बोहरा यांना फलटण वकिल संघाला प्रलंबित किरकोळ घटले येत्या दोन दिवसात निकाली काढण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील वातावरण अत्यंत आनंदी असून याठिकाणीची पाणी व्यवस्था व स्वच्छतेच्या बाबतीत इतरांच्या तुलनेत अग्रणी असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर शहरात पुरेशा वैद्यकीय सुविधांची उपल्बधता आहे. प्रदुषण कमी प्रमाणात आहे. आरोग्याच्या दृष्टी सर्वोत्तम शहर असल्याचे प्रथमच रॅलीच्या निमित्ताने निदर्शनाश आल्याचे न्याधिशांनी मनमोकळेपणा वकील संघाशी गप्पा मारताना सांगितले.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.