पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाडळीतील शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज

पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाडळीतील शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज
Updated on

मसूर (जि.सातारा) ः पाडळी (हेळगाव) येथील शेतकरी कृषी विभागाच्या मदतीने तब्बल 6000 ते 7000 रुपये क्विंटल सोयाबीनचा भाव घेणार आहेत. सतत पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाडळीमधील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला उच्चांकी भाव मिळणार आहे. एकमेकांच्या मदतीतून शेतकऱ्यांनी चाळणी यंत्रातून सोयाबीनची शुद्ध स्वरूपात प्रतवारी देण्यासाठी कंबर कसली आहे. बाजारपेठेत सध्या सोयाबीनला 3100 ते 3200 रुपये क्विंटल भाव मिळत आहे.

शेतीच्या पाण्यापासून हे गाव वंचित राहिले आहे. या स्थितीतही शेतकऱ्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्या गावाचे नाव अग्रेसर ठेवण्याची भूमिका पार पाडली आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाडळी ऍग्रो ऑरगॅनिक ग्रुप स्थापन केला आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहकार्यातून शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवण्यात येतात. शेतकरी दरवर्षी सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. यावर्षी साधारण 1200 क्विंटल सोयाबीनचे गावात उत्पादन झालेले आहे. मात्र, त्याची वेगवेगळी प्रतवारी करण्यावाचून अनेक वेळा त्यांना सोयाबीनला अतिशय कमी भावात विक्री करावी लागते. यावर्षी कृषी विभागाचे कृषी सहायक पृथ्वीराज एटणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन लागणीपासून ते सोयाबीन काढल्यानंतर त्याची प्रतवारी कशा पद्धतीने करावी, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. 

नरसिंह शेतकरी बचत गट इंदोलीतून कृषी सहायकांच्या मदतीने पाडळीच्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चाळणी यंत्र उपलब्ध केले आहे. घरोघरी सोयाबीनची चाळण करून त्याची शुद्ध स्वरूपात प्रतवारी केली जात आहे. त्यातून 85 क्विंटल सोयाबीन शासनाला बियाण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. आपल्या सोयाबीनला चांगला म्हणजे 6000 ते 7000 हजार दर मिळणार या आशेने अनेक शेतकरी एकमेकाला चाळणी यंत्रातून सोयाबीनची प्रतवारी करण्यासाठी मदत करत आहेत. त्यासाठी ऑरगॅनिक ग्रुपचे अध्यक्ष पुरंदर जाधव, प्रभाकर जाधव, लक्ष्मण जाधव, अरविंद जाधव, मोहन माने आदी शेतकरी प्रयत्न करीत आहेत.

लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले

कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील पाडळी हे अगदी अंतिम टोकाचे गाव. शेतीच्या पाण्याची नेहमीच वानवा. तरीही जेमतेम पाण्यावर अतिशय कष्टातून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून नावलौकिक कमावणारे पाडळी (हेळगाव) जिल्ह्यात प्रचलित होऊ लागले आहे.

चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही सूचना पाेचवा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.