कऱ्हाड : केंद्र आणि राज्य शासन कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशिल आहे. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत काेराेनाशी लढा देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी अहाेरात्र मेहनत घेत आहेत. पालकमंत्री पाटील हे मुंबई, सातारा, कराड या ठिकाणी वेळ देत प्रशासनाकडून आढावा घेत उपाय योजनाबाबत सूचना करत आहेत. पालकमंत्री पाटील हे सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर मतदारसंघातून निवडून आले आहेत.
सातारा जिल्ह्यात प्राथमिक टप्प्यात काेराेना लागण झालेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प हाेती. आज मितीस 11 रुग्णांची संख्या आहे. त्यातील दाेघांचा मृत्यू झाला आहे. एका रुग्ण काेराेनामुक्त झाला आहे. अन्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बहुतांश रुग्ण हे कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील आहेत. या दाेन्ही तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासकीय पातळीवर 24 तास लक्ष ठेवून उपाययोजना राबवाव्यात, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बैठकीत आदेश दिले.
हजारमाची, म्हारुगडेवाडी व डेरवण (ता. पाटण) येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्या गावांत उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सिंह, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते. या वेळी उपाययोजना काय राबवता येतील, यावर जिल्हाधिकारी सिंह यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
पालकमंत्री पाटील म्हणाले,""कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने नागरिक घाबरले आहेत. त्यासाठी प्रशासनाने अत्यंत जागृत राहून दक्षता घ्यावी. ज्या गावातील रुग्ण सापडला आहे, त्या गावात प्रत्येक शासकीय विभागाने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. लोकांना दिलासा देणारे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होण्याची गरज आहे. अद्यापही कोरोना आपल्याकडे नियंत्रणात आहे, तीच स्थिती कायम ठेवावी. लोकांनी बाहेर पडू नये. घरात बसून कोरोनाशी मुकाबला करावा. संचारबंदीचे नियम न पाळणारांवर पोलिस कारवाई करावी.''
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले,""ओगलेवाडी येथील संशयित रुग्ण सुमारे सहा लोकांच्या संपर्कात आला आहे. त्या सहाही लोकांना तपासणीला ताब्यात घेतले आहे. डेरवण येथील चिमुकल्याच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 30 पेक्षाही जास्त लोकांना ताब्यात घेतले आहे. ती सगळी स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक विभागाने काम करावे. लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून काम करण्याची गरज आहे.''
कोरोनाशी लढा देताना नागरिकांनीही अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शासकीय पातळीवर 24 तास लक्ष ठेवले जाईल. मात्र, नागरिकांनीही घरातून बाहेर पडू नये. जीवनाश्यक वस्तू खरेदीचे कारण सांगून नागरिकांनी बाहेर पडू नये.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील जिल्ह्यातील छाेट्या माेठ्या गाेष्टींवर लक्ष ठेवून आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी कराड शहरात फेरफटका मारून येथील स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. यासाठी च्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी स्वतः पाटील यांनी शहरात चालत फेरफटका मारला. आझाद चौक ते चावडी चौक दरम्यान ते फिरले. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस उपाधीक्षक सूरज गुरव, तहसीलदार अमरदिप वाकडे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कृष्णा घाट या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांची माहितीही घेतली हाेती. त्याचबरोबर नागरिक, किराणा दुकानदार यांच्याकडूनही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाबत माहिती घेतली. आझाद चौक ते चावडी चौक दरम्यान चालत पाहणी केली, डॉ. अनिल शाह यांच्या शाह हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्याशीही चर्चा केली.
जनतेने लॉक डाऊनला चांगला प्रतिसाद दिला असून यापुढेही प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नेहरू चौकातील कराड कंझ्युमर्स स्टोअर रेशन दुकानास त्यांनी अचानक भेट दिली. तेथे धान्य वितरणाचे काम सुरू होते. दुकानाचे मालक किसनराव पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली.
तेथे उपस्थित असलेल्या नागरिक व महिलांशीही त्यांनी चर्चा केली. दुकानासमोर उभ्या असणाऱ्या लोकांना उन्हात न थांबता सोशल डिस्टन्स ठेवून सावलीत बसण्याच्या सूचना त्यांनी केल्या. दुकानासमोर गर्दी होऊ नये, यासाठी दुकानातील वजन काटे वाढवून तातडीने रेशन देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. तहसीलदार वाकडे यांच्याकडून रेशन बाबत सविस्तर माहिती घेतली.
याबराेबरच सातारा जिल्हाधिकारीसह राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांशी सहकार व पणन मंत्री पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतात. वेळप्रसंगी जिल्ह्याचे मुख्य ठिकाणी स्वतः मैदानात उतरत असल्याने जिल्हावासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात
Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?
Video : त्यांना इश्काचा गुलकंद पडला महागात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.