सातारा : गेल्या पन्नास दिवसांपासून बंद असलेली सातारा जिल्ह्यातील रेस्टाॅरंटमधील किचन उघडणार आहेत. राज्यात 31 मे पर्यंत चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये असल्याने टप्प्या टप्याने व्यवसाय सुरु करण्याची जिल्हावासियांना मुभा मिळत आहे. आज (साेमवार) दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट धारकांना त्यांचे रेस्टॉरेंटमधील किचनमध्ये मागणीनूसार ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ते सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत ग्राहकाच्या मागणीनूसार फक्त होम डिलिव्हरी करावी असे आदेश काढले आहेत. यामुळे खवय्यांना आवडीचे पदार्थ घरपाेच मिळणार आहेत.
काेराेना याेद्धा बनण्याकरिताची ही आहे पात्रता
जिल्हाधिकारी सिंह यांनी काढलेल्या आदेशात राज्यात 31 मे पर्यंत चौथा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सर्व आरोग्य, पोलिस, सरकरारी अधिकारी, आरोग्य सेवा कर्मचारी, लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेले नागरीक, पर्यटक आणि अलगीकरण कक्षातील व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच बस डेपो , रेल्वे स्थानक , विमानतळावरील कॅंटीन वगळून सातारा जिल्ह्यातील सर्व रेस्टॉरंट धारकांनी त्यांचे रेस्टॉरेंटमधील किचनमध्ये मागणीनूसार ताजे खाद्यपदार्थ तयार करुन ते सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत ग्राहकाच्या मागणीनूसार फक्त होम डिलिव्हरी करावी असे म्हटले आहे.
कोणत्याही परिस्थितीत रेस्टॉरंटच्या किचममधील कर्मचाऱ्यांच्या व्यतरिक्त रेस्टॉरंटमध्ये इतर कोणत्याही त्रयस्थ नागरीकांस प्रवेश देऊ नये. रेस्टॉरंट किचनमधील कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टंनसिंग पाळणे व मास्क सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. रेस्टॉरंटमधून मागणीप्रमाणे पार्सल सेवा पुरविण्याची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत राहील. रेस्टॉरंटमधील किचन व्यतरिक्त इतर कोणाताही विभाग, खोली उघडणेस अथवा वापरणेस प्रतिबंध घालण्यात आला आहे. रेस्टॉरंटमधील किचनमध्ये रोजचेराज स्वच्छता राखावी आणि वेळोवेळी किचनमधील जागा व इतर साहित्य यांचे निर्जतुकीकरण करणे बंधनकारक राहील. पार्सलसेवा देताना कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त पैसे आकारु नयेत. डिलीव्हरी देणाऱ्या व्यक्तीकडे संबंधीत रेस्टॉरेंटचा ड्रेसकोड व ओळखपत्र असणे बंधनकारक करण्यात आले. रेस्टॉरंट मालकाने शक्यतो होम डिलीव्हरीच्या ऑडर्स या ऑनलाईन पद्धतीने स्विकारुन संबंधीत ग्राहकांस ऑनलाईन पद्धतीने माहिती पूरवावी. पार्सलसेवा पुरविणाऱ्या व्यक्तीने मास्क, फेस शिल्ड वापरणे बंधनकारक असून संबंधीत व्यक्तीने ग्राहकामध्ये कमीत कमी सहा फूट अंतर ठेऊन सेवा पुरविण्याची आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय जागा व सर्व खाजगी जागा (जेथे सामान्य माणसांचा वावर आहे) अशा कोणत्याही ठिकाणी थुंकणेस मनाई करण्यात आली आहे. कोणतीही व्यक्ती थुंकल्यास त्यास एक हजार रुपयांचा दंड केला जाइणार आहे. हा दंड ती जागा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेल त्यांचेकडे जमा करावा किंवा त्या स्थानिक संस्थेने सक्तीने वसूल करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
गणपती बाप्पांच्या माध्यमातून चालून आलीय सुवर्णसंधी
धक्कादायक ः पोटच्या मुलाचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला लपवून
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.