Lockdown2 : मटण, चिकन हवंय येथे फाेन करा

Lockdown2 : मटण, चिकन हवंय येथे फाेन करा
Updated on

सातारा : लॉकडाउनच्या महिनाभराच्या कालावधीत मटण आणि चिकनचा रस्सा व बिर्याणीवर ताव मारण्यापासून वंचित राहिलेल्या सातारकरांना घरपाचे विक्रीच्या परवानगीची जिल्हाधिकाऱ्यांनी "गुड न्यूज' दिली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या व्यावसायिकांनी घरपोच विक्री सुरू केल्याने अनेक दिवसांचा "नॉनव्हेज'चा उपवास सुटणार आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय करताना केंद्र शासनाने मटण व चिकनचा अत्यावश्‍यक गोष्टींच्या यादीमध्ये समावेश केला होता. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही भूमिका घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ही दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती. परंतु, सातारा जिल्ह्यामध्ये मटण व चिकन विक्रीला बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे "नॉनव्हेज'च्या चाहत्यांना आपल्या जिभेला मुरड घालावी लागली होती. या कालावधीत काही ठिकाणी मटण व चिकनची चोरून विक्री होत होती. त्यामुळे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तसेच चोरून विकणाऱ्या काही दुकानचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

या दरम्यान काही ठिकाणी शेतामध्ये लपून बोकड कापण्याचे व त्याचे वाटप करण्याचे प्रकारही समोर आले होते. तर, काही ठिकाणी अचानक पोलिस आल्याने बोकड तसाच सोडून पळ काढावा लागला होता. या बंदीमध्ये खवैय्यांना नॉनव्हेज मिळत नव्हते, हा एक मुद्दा होता. परंतु, त्यापेक्षाही महत्त्वाचे होते ते या व्यवसायावर अवलंबून असलेले विक्रेते आणि त्यांच्याबरोबर बोकड व कोंबडी पालन करणारे शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर आलेले संकट. विक्री बंद असल्याने अनेकांना कोंबड्यांना खाद्य देणेही परवडत नव्हते. त्यामुळे मोफत वाटप करावे लागले. याबाबत "सकाळ'ने आवाज उठवला. मटण विक्रेता संघटनेनेही निवेदन दिले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच मटण व चिकन घरपोच विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मटण व चिकनच्या विक्रीचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विक्रेत्यांनी घरपोच सेवा सुरू केली आहे. 

Breaking : अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलावे : शिवेंद्रसिंहराजे

पोलिसांना तांबडा रस्सा, मटणाचा वास आला अन्...

"सकाळ'ला कळविलेल्या विक्रेत्यांची नावे व मोबाईल क्रमांक असे :
सातारा : माणिक इंगवले : 9527293723, 8888870909, फिरोज कुरेशी : 7020757596, मुबशीर कुरेशी 9730677833, अभिषेक मोरे (फार्म फ्रेश चिकन सेंटर) 9420689689.
 
लोणंद : मनोज कांबळे 9860119393, कुमार कांबळे 9561809393, सुधीर गालिंदे 8329647389, महेश कांबळे 9860538056, धनंजय शेळके (चिकन) 9637254905.
 
खंडाळा : आकाश कांबळे 9527313299, असवली : जावेद सय्यद 7758917576.

वाई : दत्तात्रय घोडके 7798779427, प्रतीक घोडके (चिकन) 8888918882, न्यू महाराष्ट्र चिकन (बापू) 7350368965.

मोफत तांदळाचा भात शिजतोय कुठं ?

अडचणीतील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला बाबा धावले

वडूज : राजू मुल्ला 9922897337, मन्सूर मुल्ला 9096136486, अमन मुल्ला 7028395103.

खटाव : चॉंदसाब मुल्ला 9822641611, तैमुर मुल्ला 9503376253. गोपूज : अमीर शेख 8007319423.

कोरेगाव : शिरीष घोडके 9689408413, ताज चिकन सेंटर 9011199091, शिरीष मोरे (फार्म चिकन) 8888068763.

पाचगणी : अनिल कांबळे 7757961470, प्रवीण मोरे 9765375445, सुशील रांजणे 9730311656.

म्हसवड : आसिफ मुजावर 9423264597, आरिफ मुजावर 7385345649.

फलटण शहर मटण विक्रेते: मनोज सरगर 9850928821,जितेंद्र सरगर 9158564004, सचिन सरगर 8446360260, राजेश सरगर 8805084010, गौरव सरगर 9022755349, बबलू इंगवले 9156589009.

पाचगणी चिकन शॉप 91 88885 97759, आशपाक चिकन शॉप 91 96739 79038.

Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल

ए भावा...चल घेऊ पुढाकार आपल्या साताऱ्यासाठी 

CoronaVirus : बाप रे ! महाराष्ट्रात सातारा सोळाव्या क्रमांकावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.