Video : साहेब एक संधी द्या, आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु

Video : साहेब एक संधी द्या, आम्ही खांद्याला खांदा लावून काम करु
Updated on

कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यात जवळपास 400 खासगी रुग्णवाहिका आहेत. त्या रुग्णवाहिकांच्या चालक व मालकांनी कोरोनाच्या काळात शासनाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार केला आहे. शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांसोबत खासगी रुग्णवाहिका कोरोनासाठी आणि लॉकडाउनमुळे पुकारलेल्या संचारबंदीच्या काळात अन्य अत्यावश्‍यक रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. कोरोनाची भीती रुग्णवाहिका चालकांमध्ये काही प्रमाणात आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम सेवा देण्यात झालेला दिसत नाही. कोरोनासाठी भविष्यात गरज भासल्यास शासनाने कधीही बोलवावे राष्ट्रीय कर्तव्यासाठी शासनासोबत आम्ही राहू, अशी ग्वाही रुग्णवाहिका मालक सागर बर्गे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
 
जिल्ह्यात शासनाची 108 क्रमांकाची रुग्णवाहिका प्रत्येक तालुक्‍यात एक आहे. मोठ्या तालुक्‍याला दोन रुग्णवाहिका आहेत. त्याबरोबर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या गरजेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त जिल्ह्यात 400 रुग्णवाहिका आहेत. त्यात सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागात 240, तर कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन विभागात 160 रुग्णवाहिका असल्याची नोंद आहे. खासगी रुग्णवाहिकांची संख्याही चांगली आहे. त्या रुग्णवाहिकांचा शासनाला हातभार लागतो आहे. शासनाच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका कोरोनासाठी वापरल्या जात आहेत. परिणामी अन्य अत्यावश्‍यक सेवेच्या रुग्णांसाठी खासगी रुग्णवाहिका वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्या रुग्णवाहिका सध्याच्या काळात तरी अन्य अत्यावश्‍यक रुग्णांसाठी देवदूत ठरत असल्याचे स्पष्ट दिसते आहे. जिल्ह्याच्या डोंगराळ व दुर्गम भागातील रुग्ण आणण्यासह त्यांना रुग्णालयात दाखल करणे, घरी पोच करण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांचा मोठा हातभार लागतो आहे. परिणामी खासगी रुग्णवाहिका अन्य अत्यावश्‍यक रुग्णांचा आधार बनलेल्या आहेत. रुग्णवाहिका चालकांमध्ये कोरोनाची भीती आहे. मात्र, तरीही ते लोक रुग्णांच्या सेवेत दिसत आहेत. मध्यंतरी म्हारुगडेवाडी येथील कोरोनाबाधिताची मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी तो मृतदेह आणण्यासाठी शेखर बर्गे यांची रुग्णवाहिका वापरण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या काळात शासनाला गरज भासल्यास आम्ही एक पाऊल पुढे राहू, असे रुग्णवाहिका मालकांतर्फे सागर बर्गे यांनी स्पष्ट केले आहे. श्री. बर्गे म्हणाले, ""शासनाने खासगी रुग्णवाहिका चालक व मालकांची एकत्रित बैठक घ्यावी. त्यात कोरोनाच्या काळात कशा पद्धतीने काम केले पाहिजे, याबाबतचे मार्गदर्शन करावे. रुग्णवाहिका चालकांकडून काही शुल्क घेऊन त्यांना पीपीटी किट पुरवावे. अन्य अत्यावश्‍यक रुग्णांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोतच त्यासह कोरोनाच्या काळातही भविष्यात गरज भासल्यास शासनासोबत आम्ही खांद्याला खांदा देऊन काम करू.'' 

साताऱ्यात लॉकडाऊन जैसे थे: कारखानदार, बांधकम व्यावसायिकांसह मटण, चिकन, मासे विक्रेत्यांना दिलासा

हाय अलर्ट...बंदाेबस्त...प्रेम...हॅव्ह अ ब्रेक हॅव्ह अ किटकॅट


""कोरोनाला तोंड देण्यासाठी खासगी रुग्णवाहिका सहकार्य नकी करतील. या 400 रुग्णवाहिकाधारकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन करावे. त्यासाठी आम्ही सदेव तत्पर राहू. त्याशिवाय अन्य अत्यावश्‍यक सेवेच्या रुग्णांसाठी आम्ही सध्या सेवा देत आहोतच.'' 

- सागर बर्गे, खासगी रुग्णवाहिका मालक, कऱ्हाड. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.