रेशनिंग दुकानदारांचा सरकारला इशारा

रेशनिंग दुकानदारांचा सरकारला इशारा
Updated on

सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी शासन आदेशाचे पालन करत प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना गहू, तांदळाचे वाटप केले. शासनाने केशरी कार्डधारकांना एप्रिल व मे महिन्यात गहू व तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचीही अंमलबजावणी केली. सामाजिक बांधिलकी व कर्तव्य म्हणून स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता सर्व कार्डधारकांना धान्याचे वाटप केले आहे. 

याचा विचार करून शासनाने सर्व दुकानदारांना व त्यांच्या मदतनीसांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पत्रकाद्वारे केली आहे. या संबंधीचा अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन दरबारी अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे 31 मे 2020 अखेरपर्यंत शासनाने सर्व रेशन दुकानदार व त्यांच्या मदतनीसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण न दिल्यास एक जानेवारीपासून रेशनचे धान्य न उचलण्याचे व त्याचे वाटपही न करता "काम बंद आंदोलन' करण्याचा इशारा अध्यक्ष श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष संजय रजपूत, बबनराव देवरे, सचिव प्रमोद तपासे आदींनी पत्रकाद्वारे दिला आहे. 

खतप्रकल्पाअभावी हुकले पालिकेचे मानांकन 

सातारा : ...त्यानंतर विकता येणार नाही मद्य

कोरोनाच्या महामारीत माणुसकीही थांबली!

बाप मेला होता...अन्‌ प्रशासनातील माणुसकीही!

कन्या शाळेतील चिमुकलीने पॉकेटमनीतून भागवली गरजूंची भूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.