महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सकाळी धाकधूक, सायंकाळी दिलासा

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सकाळी धाकधूक, सायंकाळी दिलासा
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात सातारा येथून तीन व कराड येथून चार अशा एकूण सात कोरोना बाधितांचे चौदा दिवसानंतरचे घशातील स्त्रावाचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज (साेमवार) डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उपचारार्थ देण्यात आलेल्यांमध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेतलेल्या कारागृहातील दाेन कैदी (एक महिला वय-45 व युवक वय 18वर्ष) आणि कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील एक पुरुष (वय 40) यांचा समावेश आहे. कराड कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार घेतलेली मलकापुर येथील दोन वर्षाची एक बालीका व एक पुरुष (वय 37) व आगाशिवनगर आणि खोडशी येथील दाेन पुरुष ( दोघांचेही वय 68) यांचा समावेश आहे.

दरम्यान आज जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांचे आणि बनपुरी येथे क्वारंटाईन कक्षामध्ये असलेल्या मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 43 वर्षीय महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने तिचाही कोविड संशयित म्हणून नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

साेमवारची सकाळ चिंताजनक :नर्सच्या वडिलांनाही काेराेना

आज (साेमवार) क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 20, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 105, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 67, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे 11, ग्रामीण रुणालय कोरेगांव येथे 17 व ग्रामीण रुणालय वाई येथे 12 असे एकूण 232 जणांच्या घशातील स्त्रावांचे  नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Video : मृतदेह घरातच ठेवणारे अर्णवचे आई-बाबा असे का वागले?

सातारा : खवय्यांसाठी पर्वणी; घरपाेच मागवा आवडीचे पदार्थ 

नो मॅन्स लॅंडवर माकडांचा अन्नदाता

मासे खाण्याची चंगळ, तोच...


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()