Crime News : सातारा समाजकल्याण अधिकारी महिलेने घेतली लाच

निरिक्षकही ताब्यात ; निवासी शाळेच्या अनुदान मजूरीसाठी मागणी
Crime News
Crime News esakal
Updated on

सांगली ः जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करुन १ लाखाची लाच स्विकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय ४०) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले.

Crime News
Nashik News : चांदवडमध्ये नालेसफाई कागदावरच; प्रशासन म्हणते सफाई पूर्ण झाली, मग शहरात तुंबलेल्या गटारी कुठून आल्या?

दरम्यान याच प्रकरणात येथील समाज कल्याण निरीक्षक दिपक भगवान पाटील (वय ३६) याने आश्रम शाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Crime News
Nashik Crime News : गोमांसासह टेम्पो जप्त! चालकाला अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनची कामगिरी

घटनेची माहिती अशी, तक्रारदार यांच्या संस्थेस शासनातर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळेत शिक्षण देण्याकरिता ५९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजुर करण्यात आले होते. याकरिता अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहाय्यक संचालक सपना घोळवे हिने दहा टक्के म्हणजे ६ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. अखेर चर्चेअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली.

Crime News
Jalgaon Crime News : 27 लाखांच्या डाळींवर डल्ला; फरारी ट्रकचालकाला मध्यप्रदेशातून अटक

लाचलुचपत विभागाने आज समाजकल्याण विभागात सापळा लावला होता. अधिकारी घोळवेंनी तक्रारदाराकडे १ लाख रुपये घेवून येण्यास सांगितले. तर समाज कल्याण निरिक्षक दिपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रम शाळेच्या अनुदानाचे धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने आणलेली १ लाखाची रक्कम घोळवे हिने स्विकारताना तीला रंगेहात पकडण्यात आले. तर लाचेची मागणी करणाऱ्या निरिक्षक दिपक पाटील यास ताब्यात घेण्यात आले.

Crime News
Motivation News : कष्टातून फुलविले जीवन! वृत्तपत्र विक्री व्यवसाय आमची ‘लक्ष्मी’

लाचलुचपतचे उपाधीक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार सीमा माने, अजित पाटील, प्रतिम चौगुले, सलीम मकानदार, धनंजय खाडे, ऋषिकेश बडणीकर, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, राधिका माने, चंद्रकांत जाधव, विना जाधव, अनिस वंटमुरे यांचा कारवाई सहभाग होता.

Crime News
Maharashtra News: भाजपचे नेते नरेंद्र मोदींनाच पुन्हा नेता निवडतील का ? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

एकाच विभागात डबल धमाका

गेल्या काही दिवसात लाचलुचपतची कारवाई थंडावली होती. एकाच विभागातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने डबल धमाका लाचलुचपत विभागाने केला आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ कळवा, असे आवाहन उपाधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

साताऱ्यात तक्रारी

अधिकारी सपना घोळवे यांच्या साताऱ्यासह सागलीचा अतिरिक्त कार्यभार आहे. सातारा येथे त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्या आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.