सातारा : लॉकडाउनमुळे तब्बल दोन महिने "प्रवाशांच्या सेवेसाठी' या आपल्या ब्रीद वाक्यापासून दूर गेलेली लालपरी आजपासून पुन्हा सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यामधील प्रामुख्याने तालुक्यांच्या ठिकाणांवरून 31 एसटी बसच्या 101 फेऱ्यांचे राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे.
चौथ्या लॉकडाउनमध्ये झोनचे वर्गीकरण करण्याचे अधिकार केंद्राने राज्यांना दिले. त्यानुसार राज्याने रेड झोन व नॉन रेड झोन अशा दोन वर्गांत राज्याची विभागणी केली. नॉन रेड झोनमध्ये जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. नव्या निकषांत तिसऱ्या लॉकडाउनमध्ये रेड झोनमध्ये असलेला सातारा जिल्हा हा रेड झोनच्या बाहेर आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एसटी बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. शासनाच्या निर्देशाची आजपासून (ता. 22) एसटी रस्त्यावर आली. एसटीच्या अधिकाऱ्यांनी उत्साहाने आज गाड्यांचे नियोजन केले. सुरवातीच्या टप्प्यात प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्यासाठी तसेच एकदम गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तालुका ठिकाणांपर्यंत जाणाऱ्या 31 बसगाड्यांच्या 101 फेऱ्यांचे नियोजन विभागीय कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
प्रवाशांची सेवा एसटी पुन्हा सुरू करत आहे. यावेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गाड्यांचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. एसटीत चढणाऱ्या प्रवाशांचे हातही सॅनिटायझर्स केले जाणार आहेत. शारीरिक अंतर राखण्यासाठी एका एसटीतून केवळ 20 प्रवाशांनाच नेले जाणार आहे. तसे असले तरी, तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. परंतु, 20 प्रवासी झाल्यानंतरच एसटी हलविण्यात येणार असल्याची नोंद प्रवाशांनी घ्यावी. प्रवाशांचा प्रतिसाद विचारात घेऊन आणखी गाड्या सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
50 कुटुंबांना मदत करुन नव दांपत्य संसार वेलीवर
कोरोनाला हरवायचेय? लिहा रोजनिशी
...या मार्गावर धावणारी बस व तिची वेळ
सातारा - पुसेसावळी सकाळी नऊ , साडे दहा, दुपारी दोन, साडे तीन, सायंकाळी सव्वा सहा, पावणे आठ. पुसेसावळी - सातारा सकाळी सात, सव्वा आठ, साडे अकरा, दुपारी साडे बारा, सायंकाळी चार, पावणे सहा. कऱ्हाड-शिरवळ सकाळी नऊ , साडे दहा, दुपारी अडीच, सायंकाळी सहा. शिरवळ कऱ्हाड सकाळी साडे सात, पावणे बारा, दुपारी अडीच, सायंकाळी साडे पाच. खंडाळा शिरवळ - सकाळी सात, दुपारी दोन. शिरवळ खंडाळा दुपारी सव्वा, रात्री पावणे नऊ. कऱ्हाड पाटण सकाळी सात, नऊ, सव्वा दहा, सव्वा बारा, सव्वा वाजता, दुपारी अडीच, साडे तीन, पावणे सहा, सव्वा सात.पाटण कऱ्हाड - सकाळी साडे सात, पावणे नऊ, साडे दहा, पावणे बारा, दीड, दोन, चार, पावणे सहा, सव्वा सात वाजता.
पाटण सातारा सकाळी नऊ , दुपारी बारा, एक, चार, सायंकाळी सहा. सातारा पाटण सकाळी सात, अकरा, दुपारी दोन, तीन, सायंकाळी सहा.सातारा सकाळी आठ पासून (तासाला एक) अकरा वाजेपर्यंत, दुपारी दोन, तीन, साडे चार, पावणे सहा. सातारा मेढा सकाळी नऊ पासून (तासाला एक) बारा वाजेपर्यंत, दुपारी तीन, चार, पावणे सहा, पावणे सात.श्वर- सातारा सकाळी साडे सहा, साडे आठ, अकरा, बारा, दोन, चार, सायंकाळी सहा. सातारा - महाबळेश्वर सकाळी साडे सहा, साडे आठ, अकरा, एक , दोन, चार, सायंकाळी सहा. महाबळेश्वर वाई - सकाळी साडे सहा, साडे सात, नऊ , दहा, पावणे बारा, साडे बारा, सव्वा दोन, सव्वा तीन, पावणे पाच, सहा. वाई - महाबळेश्वर सकाळी पावणे आठ, पावणे नऊ, साडे सहा, सव्वा अकरा, एक, दोन, अडीच, पावणे पाच, सव्वा सहा, सव्वा सात. फलटण - सातारा सकाळी सहा, सव्वा आठ, पावणे अकरा, एक, साडे तीन, सहा. सातारा - फलटण सकाळी सहा, सव्वा आठ, पावणे अकरा, सव्वा, साडे तीन, सहा.
सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...
लोणंद- सातारा सकाळी सात, पावणे नऊ, अकरा, अडीच, तीन, सव्वा सहा.सातारा - लोणंद- सकाळी सात, नऊ, साडे दहा, एक, साडे चार, सहा.खंडाळा लोणंद - सकाळी सहा, दुपारी दीड.लोणंद खंडाळा - साडे बारा, सात वाजून चाळीस मिनीटांनी. सातारा वाई - नऊ, दहा, पावणे बारा, पाऊण, सव्वा दोन, सव्वा तीन, पावणे पाच, पावणे सहा, सव्वा सात, सव्वा आठ. वाई सातारा पावणे आठ, पावणे नऊ, सव्वा दहा, सव्वा अकरा, एक, दोन, साडे तीन, साडे चार, सहा व सात.दहीवडी सातारा - सकाळी आठ पासून (तासाला एक) बारा वाजेपर्यंत, दुपारी दोन, तीन, सहा. सातारा दहीवडी - सकाळी आठ, दहा, बारा, एक, तीन, चार सहा. दहीवडी - कराड - सकाळी सहा, सव्वा आठ, पावणे अकरा, एक , साडे तीन, सहा. कराड - दहीवडी - सकाळी सहा, सव्वा आठ, पावणे अकरा, एक , साडे तीन, सहा.
सातारा वडूज सकाळी आठ, दहा, बारा, एक, तीन, चार व सहावडूज सातारा सकाळी आठ, दहा, अकरा, बारा, दोन, तीन, सहा.सातारा - औंध- वडूज - साडे दहा, सायंकाळी सहा.वडूज औंध - सातारा - साडे आठ, दुपारी तीन.कोरेगाव कऱ्हाड - सकाळी सहा, आठ वाजून दहा मिनीट, पावणे अकरा, दीड, सव्वा तीन, सहा. कऱ्हाड - कोरेगाव सकाळी सहा, आठ वाजून दहा मिनीट, पावणे अकरा, एक, पावणे चार, पावणे सहा.अशा चार फेऱ्यांचे नियोजन आहे. कोरेगाव आगारातून कोरेगाव-कऱ्हाड सहा फेऱ्या, फलटण आगारातून फलटण- सातारा सात फेऱ्या, फलटण-लोणंद सहा फेऱ्या, वाई आगारातून वाई-सातारा सहा, पाटण आगारातून पाटण-सातारा आठ तर, पाटण-कऱ्हाड सहा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दहिवडी आगारातून दहिवडी-सातारा चार, दहिवडी-कऱ्हाड तीन, दहिवडी-म्हसवड सहा, महाबळेश्वर आगारातून महाबळेश्वर-सातारा आठ, महाबळेश्वर-वाई 12, मेढा आगारातून मेढा-सातारा सात, वडूज आगारातून वडूज-सातारा चार, वडूज-कऱ्हाड चार, औंध-सातारा दोन फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदा लग्न उरकायचं...दोन तीन लाख खर्च करायचं....या स्वप्नांचाच झाला चुराडा
सातारा : दाेन महिन्यांच्या बाळासाह चाैघांचा मृत्यू
...तर तुमच्या दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित हाेऊ शकताे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.