गोडोली (जि.सातारा) ः महाराष्ट्रात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या 50 दिवसांपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत नेमलेले डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, मदतनीस व इतर कर्मचारी कमी मानधनावर काम करत आहेत. मात्र, शासन स्तरावरून त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी सोमवारपासून (ता. 18) काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाचे अध्यक्षा कुंदा सहारे, सचिव संगीता सरदार यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री व सर्व प्रमुखांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे, की आरोग्य विभागामध्ये आम्ही गेल्या दहा ते 15 वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात काम करत आहोत. आमच्या संघटनेला आम्हाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी समायोजित करण्याकरिता आश्वासित करण्यात आले होते; परंतु शासनाने आता कायमस्वरूपी भरती करण्याचे योजलेले आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांत असंतोष निर्माण झाला आहे.
कोविड 19 मध्ये सर्वत्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना ड्युटी लावण्यात आल्या आहेत. कुठेही तक्रार न करता आम्ही कर्तव्य निभावतो आहोत; परंतु शासन आम्हाला चुकीची वागणूक देत आहे. त्यामुळे आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागत आहे. आमचे आमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार समकक्ष रिक्तपदावर बिनशर्त समायोजन करावे अन्यथा आम्ही 18 मे पासून काम बंद आंदोलन करणार आहोत. त्यामुळे जे काही परिणाम होतील, त्यास महाराष्ट्र शासन संपूर्णतः जबाबदार राहील.
मुंबईकर म्हणतात शाळांत क्वारंटाइन नकाे रे बाबा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.