सातारा जिल्ह्यात दहा वर्षीय मुलगा कोरोनाबाधित; एकूण बाधितांची संख्या झाली 44

सातारा जिल्ह्यात दहा वर्षीय मुलगा कोरोनाबाधित; एकूण बाधितांची संख्या झाली 44
Updated on

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात आज वनवासमाचीतील आणखी एका 10 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 32 झाली आहे. त्यातील 12 रुग्ण हे वनवासमाचीतील आहेत. दरम्यान आज (गुरुवार) कृष्णा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील 17 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. वनवासमाचीतील संबंधित मुलाच्या संपर्कातील संशयीतांना तपासणीसाठी रुग्णालयात दखल करण्यात आले आहे.

सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात कऱ्हाडला सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका सध्या कोरोना बाधीतांच्या संख्या सर्वाधिक असल्याने कऱ्हाड रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष कऱ्हाडकडे आहे. तालुक्यात बाबरमाचीतील रुग्णांपासून सुरु झालेली साखळी वनवासमाचीतील आजही सुरु राहिल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील बाधीतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ती दोन्ही गावे कोरोना हॉटस्पॉटच आहेत. मात्र संबंधित दोन्ही ठिकाणापैकी आगाशिवनगरमध्ये दोन दिवसात एकही रुग्ण न सापडल्याने तेथील चेन ब्रेक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

मात्र वनवासमाचीतील चेन ब्रेक होण्यासाठी अजुनही वाट पहावी लागणार असल्याचेच दिसत आहे. आज तेथीलच एका दहा वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या सध्या 32 झाली आहे. कालपर्यंत दाखल असलेल्या रुग्णांवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान त्या मुलाच्या संपर्कातील काही जणांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने सुरु केली आहे. आज कृष्णा रुग्णालयील 16 आणि उपजिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. दरम्यान येथील 47 जणांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे.

सातारा : औषध हवयं ? घरा बाहेर पडू नका...घरपोच मिळणार

सातारकरांना घरोघरी दूध मिळणार

सातारा जिल्ह्यातील या तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

ऋषी कपूर म्हणजे जॉली माणूस...

अशीही आठवण : इरफानच्या विनंतीवरुन टाळली पाेलिसी कारवाई

दिनांक 30.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी

1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    1151

2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    539

3.    एकूण दाखल -    1690

    प्रवासी-247, निकट सहवासीत-910, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-242,आरोग्य सेवक-263, ANC/CZ-28 एकूण= 1690

4.    अनिर्णित नमुने-    7

5.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    17

6     एकूण घेतलेले नमुने    24

7.    कोरोना बाधित अहवाल -    44

8.    कोरोना अबाधित अहवाल -    1282

9.    अहवाल प्रलंबित -    364

10.    डिस्चार्ज दिलेले-    1290

11.    मृत्यू    2

12.    सद्यस्थितीत दाखल-    398

13.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 29.4.2020) -    1624

14.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    1624

15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    771

16.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    853

17.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    237

18.    आज दाखल    0

19    यापैकी डिस्जार्ज केलेले-    172

20.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0

21.    अद्याप दाखल -    65

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.