सातारा : उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात 19 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर दाेन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच शुक्रवार (ता. 24) रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे 23 अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये शुक्रवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण न सापडल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला हाेता. गेल्या चोवीस तासांत 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर, तिघांचे अनिर्णित आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
गेले चार दिवस जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कऱ्हाड, मलकापूर नगरपालिका व त्या परिसरातील काही गावे पूर्णत: लॉक करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. मात्र, शुक्रवारी प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला हाेता. गेल्या चोवीस तासांत एकही रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुण्याहून आला नाही. शुक्रवारी दिवसभरात आलेल्या 30 अहवालांमधील सर्वजण निगेटिव्ह निघाले. त्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 21, कृष्णा हॉस्पिटल येथील चार, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील चार व कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील दोन व कऱ्हाड येथील एक अशा तीन नागरिकांच्या घशातील स्त्रावाच्या तपासणीचे अहवाल अनिर्णित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शुक्रवारी त्यांच्या संपर्कातील रुग्णांची तपासणी करण्याची प्रक्रियाही वाढली. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यातील जिल्हा रुग्णालयात 12, कृष्णा हॉस्पिटलमध्ये 24, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयात 40, फलटण उपजिल्हा रुग्णालयात दोन व कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात 31 जणांना दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका बाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतर तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, कऱ्हाडमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा पहिला नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
Breaking : एसपी तेजस्वी सातपुते भडकल्या; म्हणाल्या तुम्हांला पश्चाताप हाेईल
थुंकल्यास हजाराचा दंड
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक कडक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याला हजार रुपये तर, मास्क न वापरणाऱ्याला पाचशे रुपये दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
दरम्यान उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले पाच नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी आज शनिवार ता. 25 कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
अडचणीतील मुख्यमंत्र्यांच्या मदतीला बाबा धावले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.