चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?

चर्चाच चर्चा विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा : कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्त्यास संधी मिळणार का ?
Updated on

कऱ्हाड ः माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंडे समर्थक. मात्र, सध्या त्यांच्यापासून दुरावलेले आमदार आनंदराव पाटील ऊर्फ नाना यांच्या आमदारकीची मुदत आता पाच ते सहा दिवस उरली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नाराजी दाखवत नानांनी आमदार चव्हाण यांच्या गटापासून फारकत घेतली होती. केवळ काही तांत्रिक कारणाने आमदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता, अन्यथा नाना पूर्णतः भाजपच्या गोटात सामील झाले होते. त्यांचे पुतणे सुनील पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र प्रताप व मानसिंग यांनी भाजपत प्रवेश केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदारकी गेल्यावर नाना नेमकी काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

कोरोनाबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सध्या गाजते आहे. ती कऱ्हाडमध्येही आमदार आनंदराव पाटील यांच्या निमित्ताने सुरू आहे. नाना म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असे जिल्ह्याच्या कॉंग्रेसचे समीकरण गेली कित्येक वर्षे होते. मात्र, त्याला विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या काळात तडा गेला. तो तडा चव्हाण व नाना यांच्यात दरी होईपर्यंत वाढत गेला. पक्षांतर्गत गटाबाजीला वैतागलेल्या नानांनी थेट मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा कोनोसा घेत भाजपशी संपर्क वाढवला. भाजपचे सरचिटणीस व चव्हाण यांचे विरोधी उमेदवार अतुल भोसले यांच्याशी नाना गटाची बांधिलकी वाढली. पृथ्वीराज चव्हाण साहेब, तुमची डायरीच आमच्या हाताला लागली आहे, आता सावध राहा, असे जाहीर आव्हान अतुल भोसले यांनी दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटीगाठी झाल्या होत्या. नानांनी पक्षातील गटबाजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मांडली होती. विधानसभा ऐन रंगात येऊ लागताना या सगळ्या घटना घडत होत्या. काय करावे, याचा निर्णय घेण्याची निर्वाणीची वेळ आहे, असे सातत्याने श्री. पाटील सांगत होते. त्याचा पारिपाक म्हणून पुतणे सुनील पाटील व दोन्ही मुले त्यांनी भाजपच्या गोटात धाडली. मात्र, नानांनी त्यावेळेपासून आजअखेर पक्षप्रवेश केलेला नाही. नानांची सारे सैन्य विधानसभेला भाजपच्या बाजूने होते. मात्र, नानांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यांनी अंतर्गत हालचाली केल्या असतील. मात्र, सार्वजनिक भूमिका त्यांनी गुलदस्त्यात ठेवली होती. 

नानांनी फारकत घेण्याचे जाहीर केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांच्या गटातून काहीही प्रतिक्रिया आजअखेर आलेली नाही. नानांनीच पक्षांतर्गत कलहाकडे बाबा दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. नानांचे मलकपूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, युवकचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्याशी मतभेद झाल्याची पक्षाच्या गोटात चर्चा आहे. त्या मतभेदाचे मनभेदात रूपांतर झाले. त्याची जाहीर चर्चा व्हावी, अशी कृत्ये दोन्ही गटांकडून झाली. पोलिसांत तक्रारीही झाल्या. त्यामुळे गटांतर्गत शीतयुद्ध अंतर्गत पेटले. त्याचा परिणाम विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवर झाला. मलकापूर पालिका निवडणुकीतही ते दिसून आले. त्या सगळ्या घडामोडीत नानांना पक्षातून काढण्याची मागणी होत होती. त्याअनुषंगाने आमदार चव्हाण यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली होती. मात्र, निर्णय काय झाला, ते सर्वांना माहिती आहे. आमदारकीचा कालावधी संपपेर्यंत नानांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही. मात्र, त्यांचे घरचे शिलेदार भाजपमध्ये आहेत, हेही स्वीकारावे लागेल. आता प्रत्यक्षात नानांच्या आमदारकीची जूनच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपत आहे. त्यामुळे मुरब्बी राजकारण करत विविध पदे भोगणाऱ्या आणि खालपासून उच्चपदापर्यंत पोचणाऱ्या नानांची राजकारणाची दिशा नक्की काय असेल, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. 

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नानांच्या जागी कोण? 

आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सर्वांत जवळ, निकटचे म्हणून आमदार पाटील यांची ओळख होती. त्याचा पारिपाक म्हणून श्री. चव्हाण यांनी आमदार पाटील यांना विधान परिषेदवर त्यावेळी संधी दिली. मात्र, हीच निवड दोन्ही गटांत अंतर पाडणारी ठरली आहे. नानांच्या जागेवर आता कॉंग्रेसचाच नवा उमेदवार असणार का? असेल तर तो नवा चेहरा कोण? याकडे आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाकरे सरकार लक्ष देईना; शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत अश्रु

उद्‌ध्वस्त संसार सावरायला धावली माणुसकी

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज; वेळापत्रक जाहीर
 

लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.