मसूर : कराड - खटाव तालुक्याच्या सीमेवर खोडजाईवाडीच्या डोंगर पठारावर असलेल्या पवन चक्कीला अचानक आग लागली पवनचक्कीच्या तीन पात्याच्या मध्यभागावर लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी लागलेली आग रात्री बारा वाजेपर्यंत विझवण्यासाठीचे शर्थीने प्रयत्न सुरू होते. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठीचा पर्याय व साधने उपलब्ध नसताना झाडाच्या डाहाळ्यानी व ब्लोअर मशीनचा वापर करावा लागला वेळीच आग विझवण्याचा प्रयत्न झाल्याने आणखी डोंगरातील वनसंपत्ती वाचली.
येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडजाईवाडी डोंगरपठारावर सुजलाम् कंपनीच्या पवनचक्की आहेत. कराड खटाव तालुक्याच्या अगदी मध्यावरच खोडजाईवाडीचे डोंगर पठार आहे. या पठारावरील एका पवनचक्कीला सायंकाळी तीन पात्याच्या पवनचक्कीच्या मध्यभागावर अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा कराड -खटाव तालुक्याच्या दोन्ही भागात पंधरा-वीस किलोमीटर अंतरापर्यंत दिसत होत्या. आगीची माहिती वन खात्याला ग्रामस्थांनी दिली. घटनास्थळी वनखात्याची कर्मचारी, ग्रामस्थ तात्काळ दाखल झाले. मात्र उंच पवनचक्कीच्या मध्यभागावर आग लागल्याने ती विझवणे अशक्यप्राय होते आगीच्या ज्वाळा खाली पडल्याने डोंगर पठाराला आग लागण्यास सुरुवात झाली.
पुढील अनर्थ टाळण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसह राज्याचे कुरले व गिरीजाशंकरवाडीच्या ग्रामस्थांनी झाडाच्या डाहाळ्यांनी व ब्लोर मशिनच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या प्रयत्नामुळे रात्री बारा वाजेपर्यंत पठारावरील लागलेली आग आटोक्यात आणण्यास यश आले. अन्यथा आणखी डोंगर पठाराला वनवा लागून नुकसान झाले असते. आगीची माहिती पवनचक्कीच्या व्यवस्थापनाला वनकर्मचाऱ्यांनी दिली. पहाटेपर्यंत अग्निशामक बंब दाखल झाला.
सकाळी आठ वाजेपर्यंत आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वन खात्याच्या कर्मचार्यांनी सांगितले. वनरक्षक प्रशांत मोहिते, अश्विन पाटील, वनपाल दत्तात्रय जाधव, खात्याचे हंगामी कर्मचारी बाळासाहेब यादव, गणेश जाधव, शशिकांत जाधव, सुहास शिंदे, निलेश पाटील यांच्यासह राजाचे कुरले व गिरजा शंकरवाडीच्या ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आगीच्या घटनास्थळाचा पंचनामा अजून झाला नसल्याने नुकसानीचा आकडा समजला नाही. सदरचे घटनास्थळ हे खटाव तालुक्यात येत असल्याने औंध पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आगीची माहिती दिल्याचे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक एस जाधव यांनी सांगितले.
लाॅकडाऊनच्या काळात वाधवांन बंधूंचा प्रवास काही संपता संपेना; आता सीबीआयच्या ताब्यात
पवनचक्कीच्या तीन पात्याच्या मध्यभागी आग लागली. उंचीवर आग लागल्याने आग विझवणे अशक्यप्राय बनले. तोपर्यंत ज्वाळा खाली पडल्याने पठारावरील गवत पेटण्यास सुरुवात झाली होती. आग विझवण्यासाठीचे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते.वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अखेर झाडाच्या डाहाळ्यांनी व ब्लोर मशिनच्या साह्याने आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न सार्थकी ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.