Video : त्यांना इश्‍काचा गुलकंद पडला महागात

Video : त्यांना इश्‍काचा गुलकंद पडला महागात
Updated on

रहिमतपूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत पोलिसांची नजर चुकवून मोबाईलमध्ये चाललेल्या तमाशाच्या लावणीवर पैशाची उधळण करण्याचा टिकटॉक व्हिडिओ काही युवकांना चांगलाच महागात पडला. याप्रकरणी रहिमतपूर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले होते.
 
अपशिंगे (ता. कोरेगाव) येथील काही युवक मोबाईलवर लावणी लावून पैसे उधळतानाचा एक व्हिडिओ टिकटॉक व इतर समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपशिंगे (ता. कोरेगाव) येथे काही युवक गर्दी जमवून बसले आहेत, अशी माहिती खबऱ्यांमार्फत रहिमतपूर पोलिसांना मिळाली.

त्यानंतर या युवकांनी मोबाईलवर "झमला पिरतीचा झुल्यात झुलवा अन्‌ मला इश्‍काचा गुलकंद भरवा' हे लावणी नृत्य लावून पैसे उधळतानाचा व्हिडीओ करून तो टिकटॉक व इतर सोशल माध्यमांवर शेअर करीत असल्याचे असल्याचे समजले. त्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक जी. आर. बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची कुमक पाठवून पोलिसांनी अपशिंगे येथून सात युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भा. द. वि. कलम 188 प्रमाणे कोरेगाव न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून, त्यांना ताकीद देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलिस हवालदार राहुल कणसे करीत आहेत.

कोरोनाच्या लढाईत विविध घटक फ्रंट फुटवर आहेत. ई - सकाळच्या वाचकांसाठी आम्ही खास काही प्रेरणादायी बातम्या घेऊन आलाे आहाेत. त्या सविस्तर वाचा

Video : CoronaFighter एसपींची मूलगी का रडली ?

CoronaFighters : ते नेहमीच आमच्यासाठी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावतात

Video : हारायचं न्हाय गड्या, रडायचं न्हाय...कोरोनाला हरवून टाकायचं हाय

CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध त्यांचे सुरूच 

दिनांक 16.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
 1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    321
2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    257
3.    एकूण दाखल -    578
    प्रवासी-116, निकट सहवासीत-351, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-111 = एकूण 578
5.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    7
6    कोरोना नमुने घेतलेले एकूण-    585
7.    कोरोना बाधित अहवाल -    11
8.    कोरोना अबाधित अहवाल -    437
9.    अहवाल प्रलंबित -    130
10.    डिस्चार्ज दिलेले-    438
11.    मृत्यू    2
12.    सद्यस्थितीत दाखल-    138
13.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 15.4.2020) -    917
14.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    917
15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    592
16.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    325
17.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    162
18.    आज दाखल    9
19    यापैकी डिस्जार्ज केलेले-    75
20.    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
21.    अद्याप दाखल -    87

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.