ब्रेकिंग : पुण्यातील प्रवासी फलटणमध्ये काेराेनाबाधित

ब्रेकिंग : पुण्यातील प्रवासी फलटणमध्ये काेराेनाबाधित
Updated on

सातारा : पुणे येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला दि 25 एप्रिल  रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल करण्यात आले होते. हा युवक पॉझिटिव्ह (कोविड-19)   बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या रुग्णावर पुढील उपचार क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे करण्यात येणार आहे.

आता सातारा जिल्ह्यात 36  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 5 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 6, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 44, फलटण येथील 2 असे एकूण 58 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

तसेच 27 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा 21, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 57, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 8 असे एकूण 86 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

 गावात त्यांनी सॅनिटायझर पिल्याची चर्चा; तिघांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.