Sangli Railway : सांगली रेल्वे स्थानकासाठी 24 जानेवारीला जनआंदोलनाचा इशारा; कसे असेल आंदोलन?

गेल्या १० वर्षांत अनेक छोट्या रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे गाड्या सुरू झाल्या.
Sangli Railway Station
Sangli Railway Stationesakal
Updated on
Summary

नागरिक जागृती मंचने अनेक वर्षांपासून सांगली रेल्वे स्थानकावरून पंढरपूर, सोलापूर, बेळगाव, हुबळी, बंगळूर, गोवा, चेन्नई, हैदराबाद (Hyderabad) जाणाऱ्या गाड्यांची मागणी केलीये.

सांगली : सांगली रेल्वे स्थानकावर (Sangli Railway Station) सुविधांपासून ते गाड्यांना थांबा देण्यापासून सातत्याने डावलले जात आहे. त्याच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय नागरिक जागृती मंचने घेतला आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता सांगली रेल्वे स्थानकावर आंदोलनाची सुरवात होईल. त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले.

Sangli Railway Station
प्रतापगड किल्ल्याच्या विकासासाठी पुन्‍हा नवीन आराखडा; उपमुख्यमंत्री अजितदादांचा पुढाकार, काय आहे प्रस्ताव?

साखळकर (Satish Sakhalkar) म्हणाले, ‘‘गेल्या १० वर्षांत अनेक छोट्या रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे गाड्या सुरू झाल्या. अनेक छोट्या रेल्वे स्थानकावर रिटायरिंग रूम, लिफ्ट, एस्कलेटर (सरकता जिना) यांसारख्या सुविधा देऊन या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलून टाकला. सांगली रेल्वे स्टेशनचा विकास झाला नाही. गाड्या वाढविणे व स्थानकाच्या सुधारणेसाठी पुढाकार घेतला.

नागरिक जागृती मंचने अनेक वर्षांपासून सांगली रेल्वे स्थानकावरून पंढरपूर, सोलापूर, बेळगाव, हुबळी, बंगळूर, गोवा, चेन्नई, हैदराबाद (Hyderabad), निजामाबादला जाणाऱ्या गाड्यांची मागणी केली, सुविधांची मागणी केली. मात्र रेल्वे प्रशासनाने नवीन गाडी सुरू केलीच नाही, शिवाय सांगली रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधा देखील निर्माण केल्या नाहीत.’’

Sangli Railway Station
शिवाजी विद्यापीठात 57 वर्षांपूर्वीच वाल्मिकी ऋषींच्या 'रामायणा'वर झाले संशोधन; कथेची वेगळ्या भूमिकेतून केली पाहणी

ते म्हणाले, ‘‘पुणे-सांगली-लोंढा दुपदरीकरण प्रकल्पांतर्गत पाच हजार कोटी खर्चून विविध रेल्वे स्थानकाचा विकास केला गेला. यामध्ये प्रामुख्याने बेळगाव स्थानकावर १९० कोटी रुपये खर्च केले गेले. सांगलीपेक्षा लहान अनेक रेल्वे स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्म व पादचारी पूल देखील बांधले गेले. सांगली रेल्वे स्टेशनवर २ नवीन प्लॅटफॉर्म केले. परंतु, त्यावर पादचारी पूल बांधणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे समोर येत आहे.

माहिती-अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सांगली स्थानकावर नवीन बांधण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्म नंबर ४ व ५ ला इतर प्लॅटफॉर्म नंबर १, २ व ३ बरोबर जोडणारा पादचारी पूल मंजूर होता. ठेका एका सक्षम कंपनीला सन २०१८ मध्ये दिला गेला. कंत्राटात सांगली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वर २.५ मीटर (८ फूट) चा जिना पण मंजूर होता. पण मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने अचानक मार्च २०२३ मध्ये कंत्राटच रद्द केले. त्यामुळे प्लॅटफॉर्म बांधून उपयोग काय?’’

Sangli Railway Station
ऐतिहासिक दसरा चौकात उभारली प्रभू श्रीरामांची तब्बल 108 फुटी भव्य प्रतिमा; मंत्री पाटील, महाडिकांच्या उपस्थितीत आज अनावरण

...असे असेल आंदोलन

सांगली रेल्वे स्थानकावर २४ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व नागरिक जमतील. रेल्वे स्टेशन समोरील चौकातून स्थानकावर जाऊन रेल्वे अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवले जातील. रेल्वे स्थानकावरून मार्केट यार्डपर्यंत पदयात्रा निघेल. तेथे सभा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.