सफाई कामगार भरतीला २३ जणांकडून खोडा! कामगार खात्याकडून हवे स्पष्टीकरण

recruitment
recruitment
Updated on

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या सफाई कामगार भरती प्रक्रियेला २३ जणांनी खोडा घातला आहे. पहिल्या टप्प्यातील सफाई कामगार भरतीसाठी हे २३ जण पात्र ठरले आहेत, पण ज्यावेळी ते महापालिकेच्या सेवेत कंत्राटी तत्वावर रूजू झाले, त्यावेळी त्यांचे वय १८ पेक्षा कमी होते. त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्या २३ जणांची ही समस्या शासनाच्या कामगार खात्याकडून दूर होणे आवश्‍यक आहे.

recruitment
पूर्णवेळ अधिकारी नाही! सोलापूर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडून विवाहितांना मिळेना ‘भरोसा’

कमी वयात कंत्राटी तत्वावर सेवेत रूजू झाले तरी त्याना महापालिकेच्या सेवेत कायम करता येते का? याबाबतचे लेखी स्पष्टीकरण कामगार खात्याकडून महापालिकेला मिळणे आवश्‍यक आहे. त्यांना सेवेत घेण्यास कोणती अडचण नसल्याचे कामगार खात्याकडून सांगण्यात आले तर मग त्याना सेवेत घेता येणार आहे.

महापालिकेने कामगार खात्याकडून त्याबाबत स्पष्टीकरण विचारले आहे, पण कामगार खात्याने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील १५५ व दुसऱ्या टप्प्यातील १०० सफाई कामगारांची भरती प्रक्रिया रखडली आहे.

न्यायालयीन स्थगिती उठल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेने १५५ सफाई कामगारांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ९०० हून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते. या भरती प्रक्रियेचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे महापालिकेने दाखल झालेल्या अर्जांची पडताळणी करून अंतीम निवड यादीसाठीची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली.

विधानसभा निवडणूकीच्या आधीच ती प्रक्रिया पूर्ण झाली. पण महापालिकेने पाठविलेल्या यादीवर जिल्हाधिकाऱ्यानी आक्षेप घेतला. सफाई कामगार भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या सफाई कामगाराना प्राधान्य दिले जाणार आहे.

recruitment
तरूणांनो, एक आक्षेपार्ह पोस्ट उद्ध्वस्त करेल तुमचे आयुष्य! सोलापूर जिल्ह्यात ४ दिवसांत पाचजणांवर गुन्हा

त्यानुसारच महापालिकेने यादी तयार केली आहे. पण त्या सर्वांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तपासण्यात आली, त्यात २३ जणांबाबत समस्या उद्भवली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व १५५ पदांची भरती प्रक्रियाच तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे. आता हा विषय गंभीर झाल्यामुळे महिनाभरात त्यावर निर्णय घेतला जाईल असे आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी यानी स्पष्ट केले आहे. तर २३ कामगारांचा विषय मार्गी लागल्यावर आठवडाभरात भरती प्रक्रिया पूर्ण होईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी नितेश पाटील यानी दिली आहे.

१५५ जणांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय १०० सफाई कामगारांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही. काऱण दोन्ही भरती प्रक्रियेसाठी कंत्राटी सफाई कामगारांचेच अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्यांची निवड होईल त्याना वगळून दुसऱ्या टप्प्यातील निवड यादी तयार करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया आयुक्त डॉ. घाळी यांच्याकडून केली जाणार आहे. ती प्रक्रियाही तातडीने पूर्ण केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.