सांगली : सांगली - मिरज रस्त्यावर एक झाडं जळत होतं... त्यानं एक दिवस मान टाकली आणि स्वतः मरताना आणखी तीन जीव घेतले. आष्टा येथे कॉलेजला मुलं घेऊन जाणाऱ्या वाहनावर ते झाडं कोसळलं. तीन मुलं मृत्यूमुखी पडली... अगदी काही महिन्यापूर्वीची गोष्ट... पण त्या दुर्दैवी घटनेतून आम्ही शहाणपणा घेतलाच नाही. आता मारुती चौकात आणखी एक झाडं रोज जळतंय... तेही एक दिवस मरेल, मरताना या चौकातील किती जणांच्या डोक्यावर पडेल? माणसं मेल्यावरच शहाणपण घ्यायचं का...
"सकाळ'चे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांच्या नजरेतून हा क्षण सुटला नाही. कारण, देवळेकरांनी त्या तीन तरुणांचे गाडीत अडकलेले आणि झाडाखाली दबलेले मृतदेह पाहिले होते. रोज त्या झाडाच्या बुंध्यात कचरा जाळला जात होता. सोबत झाडही जळाले आणि कोसळले. कर्तव्य म्हणून छायाचित्र टिपताना देवळेकरांतील माणूस हादरून गेला होता. पुन्हा आपल्या शहरात तेच घडत असल्याच्या वेदनेने सुन्न होऊन त्यांनी पुन्हा एक छायाचित्र टिपले, आणखी एक झाडं हळूहळू जळत होते...पण त्या छायाचित्रात आणखी एक क्षण टिपला गेला...तो खूपच बोलका आहे. त्या झाडाखाली कुणीतरी कचरा पेटवला होता. रोजचा पेटवला जातो. तो धुमसतोय. सोबत झाडातील जीवं तपणा जाळून टाकतोय... ही आग एक दिवस जीवघेणी ठरेल, या भितीने एक शाळकरी मुलगा पाणी पिण्याच्या बाटलीतून त्यावर पाणी ओततोय...
हेही वाचा - ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांचे निधन
माझं नावं आग लावणाऱ्यामध्ये नाही...
एक लिटर पाण्याची ती बाटली. ती आगीवर नियत्रण मिळवू शकणारी नव्हतीच, मात्र त्याने तो प्रयत्न केला... त्यानं शाळेत "त्या चिमणीची गोष्ट' शिकलीय. एकदा जंगलात कुणीतरी आग लावली. खूप आग वाढली. झाडे जळू लागली. त्यावेळी सारे प्राण दूर पळाले. एक चिमणी मात्र शेजारील तळ्यातून आपल्या चोचीत पाणी घ्यायची आणि पेटत्या झाडांवर टाकायची. तिचे हे कृत्य पाहून एक प्राणी चिमणीला म्हणाला, ""तू केवढी, तुझी चोच केवढी. असं पाणी ओतून आग आटोक्यात येणार आहे का?'' तो प्राणी आजच्या सोशल मिडियावरील "ऍडिक्ट' मंडळींचे प्रतिनिधीत्व करत असावा. त्याला चिमणीने दिलेले उत्तर बिनतोड होते. ती म्हणाले, ""भविष्यात कधी या जंगलाला लागलेल्या आगीचा इतिहास लिहला जाईल तेंव्हा माझं नावं आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्यांमध्ये येईल.''
हेही वाचा - खासगी बसमधून कोकणी मेवा नेण्यास बंदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.