Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patil
Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patilesakal

Ganesh Chaturthi : गणेशचतुर्थीची शाळांना सुटी कधी? राज्य सरकारनं जारी केला आदेश

सरकारने सुटीचा दिवस बदलावा, अशी मागणी होत आहे.
Published on
Summary

काही शाळांनी सोमवारी शाळा सुरू ठेवून मंगळवारी सुटी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बेळगाव : शहर आणि परिसरात मंगळवारी (ता. १९) गणेशचतुर्थी (Ganesh Chaturthi) मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे. मात्र, राज्य सरकारने (Karnataka Government) सोमवारी (ता. १८) सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे नेमकी सुटी कधी घ्यावी, असा संभ्रम शाळांसमोर (School) निर्माण झाला आहे.

Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patil
Chaitra Kundapur : भाजपकडून तिकीट देण्याचं आमिष दाखवून पाच कोटींची फसवणूक; आरोपी चैत्राचा आत्महत्येचा प्रयत्न?

सरकारने सुटीचा दिवस बदलावा, अशी मागणी होत आहे. काही शाळांनी सोमवारी शाळा सुरू ठेवून मंगळवारी सुटी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा शिक्षाणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नीतेश पाटील (Collector Nitesh Patil) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे गणेशचतुर्थीची सुटी सोमवारीच (ता. १८) जाहीर केल्याचे सांगितले.

Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patil
गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! 'टोलमाफी'बाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

त्यामुळे शाळांसह इतर सरकारी कर्मचाऱ्यांची अडचण होणार आहे. मंगळवारी गणेशचतुर्थी दिवशी सुटी देण्याऐवजी सोमवारी सुटी दिल्याने मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

Schools Holiday Ganesh Chaturthi Belgaum Collector Nitesh Patil
मोठी बातमी! 'अंजुमन'चा अर्ज फेटाळत ईदगाह मैदानावर गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेस High Court ची परवानगी; हिंदुत्ववाद्यांचा आनंद मावेना गगनात

मात्र, अद्याप तरी सुटीत बदल झाला नसल्याची माहिती शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळत नसल्याने काही शाळांनी मंगळवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.