गुप्तधन, मांत्रिक, कर्ज अन् नऊ बळी.., म्हैसाळमध्ये काय घडलं काल रात्री?

एक कुजबुज म्हैसाळ गावात घुमत राहिली, गुप्तधनाचा शोध, तासगावचा मांत्रिक, त्यातून कर्जबाजारीपण आणि नऊ जणांचा बळी.
mhaisal sangli crime News
mhaisal sangli crime News
Updated on
Summary

एक कुजबुज म्हैसाळ गावात घुमत राहिली, गुप्तधनाचा शोध, तासगावचा मांत्रिक, त्यातून कर्जबाजारीपण आणि नऊ जणांचा बळी.

सांगली : रविवारी रात्री नऊच्या सुमारास पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाने पाणी भरलं... अंगणात हसत-खेळत काम केलं... झाडांना पाणी घातलं... विष पिऊन आत्महत्या करणारी माणसं मरण्याआधी असं वागत्यात काय, असा भाबडा प्रश्‍न त्यांच्या एका शेजाऱ्यानं केला. रात्री अकरा वाजले असतील, शिवशंकर कॉलनीतील सगळ्यांनी दारं बंद केली, झोपी गेले, त्यानंतर एक दुचाकी गेल्याचा आवाज आला... ती शुभमची असावी... बस्स, बाकी रात्रीत काय घडलं, कसं घडलं आता काळाच्या पोटातं दडलंय... पण, एक कुजबुज म्हैसाळ गावात घुमत राहिली, गुप्तधनाचा शोध, तासगावचा मांत्रिक, त्यातून कर्जबाजारीपण आणि नऊ जणांचा बळी. (mhaisal sangli crime News)

स्त्रीभूण हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरात बदनाम झालेलं संपन्न गाव म्हैसाळ, ते आज पुन्हा एकदा हादरून गेलं. पोपट वनमोरे आणि माणिक वनमोरे या भावांच्या कुटुंबाचा अंत धक्कादायक ठरला. वरकरणी ही नऊजणांची आत्महत्या वाटत असली तरी नऊही जणांच्या मनात एकावेळी असा अघोरी विचार आला असावा, हे कुणीच मान्य करेना. नऊ जणांचा बळी गेला की त्यापैकी काहीजणांनी तो घेतला आणि मग स्वतः आत्महत्या केली हे गूढ कायम आहे.

mhaisal sangli crime News
एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलवर नारायण राणे म्हणाले, ते कुठं आहेत...

या संशयाच्या केंद्रस्थानी दोन व्यक्ती आल्या, ते म्हणजे पोपट आणि माणिक हे वनमोरे बंधू. पोपट रयतचे शिक्षक तर माणिक हे पशुवैद्यक. उत्तम पगार, चांगला व्यवसाय, टुमदार बंगले असलेले कुटुंब. पोपट यांची कन्या राष्ट्रीयीकृत बँकेत कर्मचारी... हुशार मुलगी. शुभम साध्या राहणीचा, पोलिस होण्याचे स्वप्न बाळगणारा तरुण. आई पंधरा दिवस एकाकडे, पंधरा दिवस दुसऱ्याकडे रहायची. काही दिवस ती नातीसोबत कोल्हापुरात राहिली होती. लोक सांगतात, या दोघा भावांना गुप्तधनाच्या नावाखाली काही मांत्रिकांनी घेरले होते. एका नातेवाईकाने संशय व्यक्त केला की तो मांत्रिक तासगावचा आहे.

गुप्तधनाचा शोध घ्यावा, नासा या अमेरिकास्थित संस्थेत काहीतरी आश्चर्यकारक वस्तू पाठवावी आणि कोट्यवधी रुपये कमवावेत, असे त्यांना वाटत असावे. अलीकडच्या काळातील त्यांच्या चर्चा, त्यांना भेटणारे लोक यावरून हा संशय बळावत गेला. काल या दोघा भावांनी एका किराणा दुकानातून वीस नारळ आणले होते. किराणा दुकानदाराने उत्सुकतेने विचारलेदेखील, काय कार्यक्रम आहे का... आज त्या वीस नारळांभोवतीही संशयकल्लोळ आहे.

mhaisal sangli crime News
मिरज : एकाचवेळी घेतले विष; नऊ जणांच्या आत्महत्येेने खळबळ

अंधारात बसायचे भाऊ-भाऊ

पोपट आणि डॉ. माणिक हे दोघे भाऊ अंधाऱ्या ठिकाणी जाऊन उशिरापर्यंत बोलत बसायचे. रात्री अकरा-बारा वाजले तरी त्यांना भान नसायचे, असे काहींनी सागितले. शुभम आणि पोपट या बापलेकांचे नाते अगदी मित्रासारखे होते. लेकीने बँक परीक्षेत यश मिळवल्याचा सगळ्या घराला आनंद होता. शुभमने तर त्याच्या एका मित्राला सांगून ऑगस्टमध्ये ताईचा वाढदिवस आहे आणि त्यावेळी तिचा विमा उतरवायचा आहे, असे सांगितले होते.

गुप्तधन... बळीचे कारण

गुप्तधनाचा शोध, त्यासाठी टोळीच्या आहारी जाणे, मांत्रिकाची संगत, त्यातून कर्जबाजारीपण, तणाव असे अनेक अँगल या घटनेला आहेत. डॉ. माणिक यांच्या एका नातेवाईकाने तासगाव येथील एका मांत्रिकाच्या हे लोक संपर्कात होते, असा संशय व्यक्त केला. तो मांत्रिक कोण... या भावांनी काल वीस नारळ कसासाठी खरेदी केले होते, गुप्तधनाचा शोध लावून देतो, असे सांगणारी टोळी कोण, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. त्याच्या मुळापर्यंत पोलिसांना जावे लागणार आहे.

mhaisal sangli crime News
शिवसेनेचं टेन्शन वाढलं, एकनाथ शिंदेनंतर आणखी तीन मंत्री नॉट रिचेबल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.