वांगी, (सांगली ः : आधुनिक युगात प्रामाणिकतेला ओहोटी लागलेली आपण पावलोपावली अनुभवत आहोत. सर्वच क्षेत्रात सध्या अप्रामाणिकतेने कळस गाठला आहे. मात्र सततचा तोट्यातील शेतकरी अद्यापही प्रामाणिक असल्याचे वांगी (ता. कडेगांव) येथील शेतकरी विठ्ठल यशवंत माळी यांनी सिध्द केले आहे. आपले सहकारी शेतकरी अनिल रामचंद्र माळी यांचे रस्त्याकडेला पडलेले 50 हजार परत देऊन त्यांचे कष्ट वाया जावू दिले नाहीत.
अनिल माळी हे वांगीच्या उत्तरेस माळी मळ्यात राहतात. काही दिवसांपूर्वी आपली द्राक्षे त्यांनी कडेगांव येथील व्यापाऱ्यास विकली होती. त्यामधील रक्कम रुपये 50 हजार घेऊन ते रात्री 8 वाजता कडेगांवहून घरी निघाले. यामध्ये 500 रूपयांच्या 92 नोटा व रु.2 हजार च्या 2 नोटा होत्या. वांगीत आल्यानंतर खिशातील पैशांचा बंडल तपासून पाहिला व ते दुचाकीवरुन मळ्याकडे मार्गस्थ झाले. घरी पोहचताच खिशातील 50 हजार रस्त्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्याक्षणी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. घरातील आणि शेजारीपाजारी रस्ता धूंडाळू लागले. गावापर्यंतचा रस्ता चार वेळा शोधूनही पैशांचा पत्ता लागला नाही. वर्षभर प्रचंड कष्ट करुन पदरी पडलेली रक्कमही हरवल्याने कुटूंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दरम्यान मळ्यातीलच द्राक्षबागायतदार शेतकरी विठ्ठल यशवंत माळी रात्री साडेआठच्या दरम्यान मूलाला दवाखान्यात घेऊन दूचाकीवरुन वांगीस निघाले असता त्यांना रस्त्यात 50 हजार सापडले.
दवाखान्यातून घरी परतल्यावर सदर 50 हजार रक्कम हरविलेचा मेसेज गावातील "व्हाटसअँप" ग्रुपवर फिरु लागला होता. तो पाहून त्यांनी अनिल यांना फोन करुन याची कल्पना दिली व बोलावून रक्कमही परत दिली. यावेळी अनिल यांना आपले अश्रू लपविता आले नाहीत. कारण यावर्षी महापूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, विचित्र हवामान यांचेशी दोन हात करीत मिळवलेले पैसे क्षणात हराविले तर पुढिल वर्ष कसे काढायचे ? हा प्रश्न सतत डोळ्यासमोर येत होता. परंतु दैव बलवत्तर आणि प्रामाणिक विठ्ठल यामूळेच पैसे परत मिळाल्याची भावना अनिल यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.