"ती' मगर पुन्हा दिसल्याने घबराट...! 

Seeing Crocodile Again
Seeing Crocodile Again
Updated on

केत्तूर (सोलापूर) : भीमानगर (ता. माढा) येथे 1 डिसेंबर रोजी मच्छीमारांनी धाडसाने महाकाय मगर पकडून ती इंदापूर वनविभागाच्या ताब्यात दिली होती. परंतु, तीच मगर पुन्हा एकदा उजनी जलाशय नजीकच्या भिगवणजवळील धुमाळवाडी (ता. इंदापूर) परिसरात दिसल्याने मच्छीमार, पर्यटक, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा मगर दिसताच मच्छीमारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी उमेश सल्ले, बाळू धुमाळ, निखिल धुमाळ, सुरेश कनिचे, विठ्ठल भोई, प्रदीप कनिचे आदींना ही मगर दिसताच पुन्हा एकदा उजनी जलाशय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

पर्यटकांच्या संख्येत वाढ 
1 डिसेंबर रोजी सकाळी 10च्या सुमारास 12 फूट लांब व 150 किलो वजनाची महाकाय मगर भीमानगर येथे मच्छीमारांना सापडली होती. ही मगर मच्छीमारांनी इंदापूर वनविभागाच्या ताब्यात दिली होती. मगर वनविभागाने प्राणिसंग्रहालय अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याऐवजी ती उजनी जलाशयाजवळच धुमाळवाडी येथे मूळ अधिवासात सोडली अशी चर्चा होती. अथांग भरलेल्या उजनी जलाशय परिसरात सध्या देशी-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी वाढू लागली असल्याने पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी मगर सोडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

मगरींपासून संरक्षणासाठी यंत्रणा उभा करा 
उजनी धरणाच्या जलाशयात अलिकडे सतत मगरी आढळून येत आहेत. त्यांच्यापासून संरक्षण व्हावे याकरिता आवश्‍यक यंत्रणा उजनी जलाशय परिसरात उभी करावी. तसेच शोधमोहीम राबवून मगरींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. या मगरी शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहेत. 

भीमानगर (ता. माढा) येथे उजनी धरणाच्या माती बंधाऱ्यावर 12 फूट लांब 150 किलो वजनाची मोठी मगर आढळली. येथील भोई समाजाच्या तरुणांनी ती धाडसाने पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. गतवर्षी कंदर (ता. करमाळा) येथे एक मगर पकडली होती. उजनी जलाशयात अलिकडे मगरींचा वावर असल्याचे आढळून येत आहे. मगरीपासून केवळ मच्छिमारांनाच धोका नसून जलाशयाच्या काठावर राहणाऱ्यांना, शेतकरी, शेतमजूर, गुराखी, जनावरे आणि जलमार्गाने प्रवास करणाऱ्यांना धोका आहे. तालुक्‍यातील वनविभागाशी संपर्क साधला असता याबाबत माहिती नसून कोणती उपाययोजना करावी ते माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

नवनवीन तंत्रज्ञान विकसित 
हिंस्र प्राण्याची अस्तित्व दाखविणारी प्रणाली विकसित अलिकडे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून वन्य, हिंस्र प्राण्याची चाहुल, अस्तित्व दाखविणारी प्रणाली विकसित केली गेली आहे. नान्नज (उत्तर सोलापूर) येथील अरण्यात शेळी, बकरे फस्त करणारा लांडगा आढळतो. लांडग्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना घडत असतात. यावर उपाय म्हणून लांडग्याच्या विशिष्ट आवाजावरून तो परिसरात आल्याची सूचना देणारी यंत्रणा परिसरात उभारण्यात आली आहे. त्यामुळे शेळ्या, मेंढ्या राखणाऱ्याला वन वनविभाग सूचना देतो. त्यामुळे नुकसान टळते. अशा प्रकारची यंत्रणा वन विभागाने उजनी जलाशय परिसरात उभी करावी व दुर्घटना टाळावी, अशी मागणी होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.