वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती आता WhatsApp वर कळवा; 'महावितरण'चे नागरिकांना आवाहन

पुणे परिमंडल अंतर्गत व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Whats App Mahavitaran
Whats App Mahavitaranesakal
Updated on
Summary

ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजवाहक तारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉट्सअॅपद्वारे (Mobile WhatsApp) द्यावी, असे आवाहन महावितरणकडून (Mahavitaran) करण्यात आले आहे.

Whats App Mahavitaran
Lek Ladki Yojana : 'लेक लाडकी' आता नव्या स्वरूपात; शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत

वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचे छायाचित्र व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे संबंधित मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. यासह २४ तास सुरू असणाऱ्या १९१२ या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Whats App Mahavitaran
Sadabhau Khot : राजू शेट्टींची 'ही' मागणी पूर्ण झाल्यास, मी राजकारण सोडतो; सदाभाऊंचं ओपन चॅलेंज

पुणे परिमंडल अंतर्गत व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यासाठी ७८७५७६९४४९ हा क्रमांक आहे. महावितरणची वीजवाहक तार तुटलेली आहे, तारेचा झोल किंवा तार जमिनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडे किंवा तुटलेले आहे.

रोहित्राचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे आदी स्वरुपाची तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्स अॅपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

Whats App Mahavitaran
आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार; ऊसदरावरुन शेट्टींचा आक्रमक पवित्रा

व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झालेली छायाचित्रासह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येते. दुरुस्तीनंतर तक्रारकर्त्यांना व्हॉट्सअॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवले जाते. काही तक्रार असल्यास निवारणासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी, हस्तांतरणाची आवश्‍यकता असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवले जातील. त्याबाबतही तक्रारकर्त्यांना कळवले जाईल. या उपक्रमाला प्रतिसाद अपेक्षित आहे.

-अंकुश नाळे, संचालक, पुणे प्रादेशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.