Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन दिल्यावर असा किती मोबदला सरकार देणार आहे? काळी आई विकून पैसे कमवणारे आम्ही शेतकरी नाही. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकर्याने शेतात जावून आत्महत्या केल्याचे ऐकलेय का कधी? पिढ्यानपिढ्या आमचे शेत आम्हाला भरभरुन देत आहे. आमच्या यापुढच्या पिढ्यांना पण सरकार जमिनीचा मोबदला देतच राहणार आहे का? सोन्याचे अंडे देणारी कोंबडी एकदाच मारुन खायची नसते, अशी प्रतिक्रिया शक्तिपीठ संघर्ष समितीतील सुदाम पाटील यांनी व्यक्त केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी स्वाभिमानी पक्ष एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात खदखद सुरु आहे, ज्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत फार तीव्र नसले तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये हा कळीचा मुद्दा असणार आहे..