Politics : पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हा, म्हणून पवारांकडं कशाकरता आग्रह धरायचा? NCP ज्येष्ठ नेत्याचं मोठं वक्तव्य

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Sharad Pawar Resigns NCP
Sharad Pawar Resigns NCPesakal
Updated on
Summary

शरद पवार यांच्या प्रकृतीच्या काही समस्या आहेत. वयाचा मुद्दा आहेच. अशावेळी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हा, म्हणून कशाकरिता आग्रह करायचा.

इस्लामपूर (सांगली) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी राजकारण सोडले नाही. त्यांना वयाची 82 वर्षे पूर्ण झाली आहेत. एका आजारातून ते निर्धाराने बरे झाले. न थांबता पक्ष वाढवला. अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांनी या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अण्णा डांगे (Anna Dange) यांनी व्यक्त केले.

'अध्यक्षपदाची धुरा अन्य कोणावरही सोपवावी'

ते म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या प्रकृतीच्या काही समस्या आहेत. वयाचा मुद्दा आहेच. अशावेळी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष व्हा, म्हणून कशाकरिता आग्रह करायचा. पवार यांच्या पसंतीने पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा अन्य कोणावरही सोपवावी. नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पाच ते दहा पदाधिकाऱ्यांची टीम तयार करून पुढील कामाची दिशा ठरवावी. त्यांच्या विचार सरणीतून व अनुभवातून नवी पिढी काम करेल. प्रकृती साथ देत नसताना आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ खंडोबा होत असताना त्यांना या वेदना सहन होत नाहीत, हे समजून घेतले पाहिजे.’’

Sharad Pawar Resigns NCP
Bazar Samiti Election : 'शेतकऱ्यांसाठी विरोधात लढलो, पण 'या' चार आमदारांमुळं माझा पराभव झाला'

'1980 ला पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली'

ते म्हणाले, ‘‘त्यांनी विचार करायला, चिंतन करायला त्यांनी दोन-तीन दिवसांचा अवधी घेतला आहे. मला असे वाटते, त्यांनी आता नवीन टीम करावी. नाईलाजाने इतर पक्षांची आघाडी करून राजकारण करावे लागले तर ते अपरिहार्यता म्हणून करावे. आपण जसे 1980 ला पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवत पक्ष सत्तेवर येण्यापर्यंत भक्कमपणे उभा केला. त्याची आज आवश्यकता आहे.’’

Sharad Pawar Resigns NCP
Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनं खळबळ; NCP कार्यकर्त्यांत अस्‍वस्‍थता, आंदोलनाची तयारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.