video : शेवगावचा शिक्षण विभाग "सैराट' झाला जी... 

Sheggaon's Education Department has become Sairat
Sheggaon's Education Department has become Sairat
Updated on

शेवगाव : शेवगावातील शिक्षण विभागच "सैराट' झाला आहे. शिक्षक, केंद्रप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क झिंगाट गाण्यावर ठेका धरून "नवशिक्षण' दिले. एकमेकांना खांद्यावर घेऊन शिक्षकच नाचायला लागल्यावर विद्यार्थीही चेकाळले. तेही व्यासपीठावर चढले. टाळ्या-शिट्या वाजवीत त्यांनी मास्तरांना चिअर-अप केले. गुरुजींसह अधिकाऱ्यांचा हा "सैराट'पणा व्हायरल झाला आहे. तालुक्‍याच्या शिक्षण विभागात त्याची चर्चा सुरू आहे. भातकुडगाव जिल्हा परिषद गटाच्या ढोरजळगावातील बालआनंद मेळाव्यात त्यांनी हा "आनंद' लुटला


ढोरजळगाव ः बालआनंद मेळाव्यात व्यासपीठावर गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांनी धरलेला ठेका. 
 

केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी धरलेला ठेका पालकांमध्ये व शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. महिला शिक्षक व चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर ते बेभान झाले. त्यांचा झिंगाट व्हिडिओ शिक्षकांच्या, तसेच पालकांच्या ग्रुपवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हा आनंदमेळावा नेमका कोणासाठी होता, असा सवाल केला जात आहे. 
विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देणारे शिक्षक, त्यांना मार्गदर्शन करणारे केंद्रप्रमुख आणि तालुक्‍यातील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, अशा जबाबदार पदांवरील व्यक्ती स्वतःच अश्‍लील गाण्यांवर हावभावासह नाच करीत असतील, तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून काय शिकावे, अशी चर्चा पालकवर्गात सुरू आहे. 

ग्रामीण विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान आणि आनंद मिळावा, या उदात्त हेतूने गटनिहाय बालआनंद मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून खाद्य, कला, शैक्षणिक साहित्य दालन, भाजीबाजार भरविले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. 
तालुक्‍यातील भातकुडगाव जिल्हा परिषद गटाचा बालआनंद मेळावा ढोरजळगाव-ने येथील जिल्हा परिषद शाळेत पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, गटाचे प्रतिनिधित्व करणारे रामभाऊ साळवे, बाजार समितीचे संचालक संजय कोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

सायंकाळी समारोपप्रसंगी शीण हलका करण्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरच सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर ठेका धरला. काही उत्साही शिक्षकांनी तर एकमेकांना उचलून घेत आपल्यातील नृत्यकौशल्य विद्यार्थ्यांसमोर सादर केले. गुरुजीच बेभान झाले म्हटल्यावर विद्यार्थी कसे मागे राहतील? त्यांनीही मग मंडपात ठेका धरला. हे पाहताना उपस्थित महिला शिक्षक व ग्रामस्थांना अस्वस्थ होण्याशिवाय पर्याय नव्हता. 

यांनी धरला ठेका 
गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, केंद्रप्रमुख विलास हुशार, शिक्षक सुरेंद्र गिऱ्हे, दादासाहेब अकोलकर, गणेश शिणगारे, कांडेकर यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. गटशिक्षणाधिकारी कराड म्हणतात, आग्रह झाला म्हणून नाचला, त्यात काय एवढे? 

अहवाल मागविला

शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या नृत्याचा व्हिडिओ शिक्षण विभागाकडे आला आहे. त्यांनी केलेले कृत्य निंदणीय आहे. त्यांना नोटिसा पाठवून अहवाल मागविला आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. बालआनंद मेळाव्यात देशभक्तीपरगिते, पथनाट्य, नकला आदी कार्यक्रम सादर करण्यासच परवानगी आहे. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.