शिराळा नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत

शालेय मुलांच्या हस्ते काढल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या
Shirala
Shiralasakal
Updated on

शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण महिला, यासाठी सुधारित आरक्षण सोडत आज तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. ही सोडत जाहीर होताच अनेक इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या आहेत.

ज्या ठिकाणी महिला आरक्षण पडले, तिथे कोणाच्या घरातील महिलांना निवडणूक लढविता येणार, याचीच चर्चा आरक्षणानंतर सुरू होती. नियंत्रण कक्ष उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी आरक्षण सोडतीचे काम पाहिले. शिराळा नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. या प्रभागांत ९ ठिकाणी महिलाराज आहे. यामध्ये प्रभाग १- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग- २ सर्वसाधारण महिला, प्रभाग ३-सर्वसाधारण महिला, प्रभाग ४-सर्वसाधारण, प्रभाग ५-सर्वसाधारण, प्रभाग ६-सर्वसाधारण महिला, प्रभाग ७-

नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ८-सर्वसाधारण, प्रभाग ९-सर्वसाधारण महिला, प्रभाग १०-नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ११-सर्वसाधारण महिला, प्रभाग १२-सर्वसाधारण, प्रभाग १३ - सर्वसाधारण, प्रभाग १४-अनुसूचित जाती महिला, प्रभाग १५-अनुसूचित जाती, प्रभाग १६-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १७-सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले आहे. याबाबत २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. संस्कृती चव्हाण, राजगौरव मुळे, सक्षम चोपडे, अनुजा गुंजाळ या शालेय मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

यावेळी विजयराव नलवडे, के. डी. पाटील, बंडा डांगे, रणजितसिंह नाईक, विश्वास कदम, केदार नलवडे, बसवेश्वर शेटे, अजय जाधव, संतोष हिरुगडे, वसंत कांबळे, सम्राट शिंदे, सत्यजित कदम, आनंदा औताडे, संजय इंगवले, काजल शिंदे, प्रीती पाटील, राम पाटील, अभिजित यादव, राजसिंह पाटील, संजय हिरवडेकर, अविनाश खोत, संतोष गायकवाड, कुलदीप निकम, सुशील गायकवाड, लक्ष्मण मलमे, मोहन जिरंगे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.