Battis Shirala : शिराळ्यात एक दिवसात नागपंचमीला कोट्यवधींची होते उलाढाल; आणखी काय खास आहे गावात?

वर्षातून एक दिवसाचा नागपंचमी सण तालुक्याला प्रसिद्धीच्या झोतात आणणारा आहे.
Battis Shirala Snake Festival
Battis Shirala Snake Festival esakal
Updated on
Summary

समर्थ रामदासस्वामी स्थापित ११ मारुती पैकी १ मारुती शिराळ्यात आहे. येथे प्रत्येक आठवड्याला ११ मारुती दर्शन करणारे भाविक येतात.

शिराळा : ऐतिहासिक वारसा व तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या शिराळा शहरात अनेक बदल होत असले तरी बदलत्या प्रवाहानुसार गावचा विस्तार व जागेचे दर वाढले त्या पटीत प्रगती व सोयी-सुविधा निर्माण झालेल्या नाहीत. शिराळा आगार, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिराळा पोलीस ठाणे, पंचायत समितीची भव्य इमारत उभी राहिली आहे. मात्र, शिराळा नगरपंचायतचा कारभार पूर्वीच्या ग्रामपंचायत इमारतीत सुरू असल्याने गावच्या मिनी मंत्रालय स्वतंत्र इमारतीच्या प्रतीक्षेत आहेच. येथील मुख्य बाजार पेठांना पुरेशी विस्तारासाठी जागा नसल्याने कमी जागेत मोठ्या इमारती बांधकाम करून जागा भाडोत्री देण्यावर लोकांचा कल वाढल्याने कमी जागेला चांगले दर व भाडे मिळत आहे.

Battis Shirala Snake Festival
Kolhapur Lok Sabha : दुपारनंतरच होणार निकालाचे चित्र स्पष्ट; 'राधानगरी'त होणार सर्वाधिक 30 फेऱ्या, मतमोजणीसाठी 504 कर्मचारी

पूर्वी केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्याच्या हाती दुग्ध आणि विविध छोट्या-मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून पैसा खेळू लागला आहे. वर्षातून एक दिवसाचा नागपंचमी सण तालुक्याला प्रसिद्धीच्या झोतात आणणारा आहे. सात दिवस असणाऱ्या गोरक्षनाथ यात्रा व एक दिवसाच्या नागपंचमीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. समर्थ रामदासस्वामी स्थापित ११ मारुती पैकी १ मारुती शिराळ्यात आहे. येथे प्रत्येक आठवड्याला ११ मारुती दर्शन करणारे भाविक येतात. त्यामुळे हॉटेल व स्टॉल धारकांना आर्थिक हातभार लागतो.

मात्र, इतर वेळी केवळ तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती येथे शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे फक्त त्या आवारात असणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना उदरनिर्वाह सुरु आहे.शिराळा औद्योगिक वसाहतीत हवे तवढे मोठ मोठे व्यवसाय आलेले नाहीत.त्यामुळे त्या ठिकाणी ही व्यवसायाला पुरेसा वाव नाही. २०११ च्या गणनेनुसार शिराळाची लोकसंख्या १९,३०४ असली तरी सध्या ३० हजारांवर आहे.शहरात जागा कमी असल्याने व वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांनी आपापल्या सोयीनुसार गावाबाहेर रस्त्यालागत असणाऱ्या शेतात घरे बांधण्यास सुरुवात केली आहे.

Battis Shirala Snake Festival
Konkan Tourism : हिरवेगार जंगल अन् निळाशार धबधबा..; हा निसर्गसोहळा अनुभवायचाय असेल, तर 'या' गावाला जरुर भेट द्या..

वाढीव ठिकाणी रस्ते पाणी या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत. तर काही ठिकाण विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. शिराळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते बिऊर दरम्यानच्या पाच किलोमीटर अंतरावरील शेत जमिनीला केवळ बाह्यवळ रस्त्यामुळे सोन्याचा भाव आला आहे. त्या ठिकाणी नवनवीन उद्योग सुरु होऊ लागले आहेत. शहरात व परिसरात मंगल कार्यालय यांच्यासह अनेक बँका व पतसंस्था यांची दिवसेंदिवस भर पडत आहे.उपजिल्हा रुग्णालय वगळता एकाच छता खाली अति तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. जुन्या वाड्यांची व कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या बंगल्यानी घेतली आहे.

खाद्य संस्कृतीत बदल होत असताना टपरीच्या चहाची जागा आता वेगवेगळ्या नावाच्या चहांनी घेतली आहे. भजी, वडापाव, मिसळ बरोबर भेळ, पाणीपुरी, बर्गर, पिझ्झा, पावभाजी, आईस्क्रीम अशी वेगवेगळी बेकरी उत्पादने यांनी बाजारपेठेवर कब्जा केला आहे. मावा, गुटखा यांनी तर गल्लीबोळात ठाण मांडले आहे. हॉटेल आणि बीअरबार, देशी दारू दुकान यांचीही संख्या वाढू लागली असल्याने विकासापेक्षा व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Battis Shirala Snake Festival
Lagna Muhurat 2024 : लग्नसराईला तब्बल 58 दिवसांचा लागणार ब्रेक; विवाहासाठी 'या' तारखेपर्यंत मुहूर्तच नाहीत!

यांचा अभाव

वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा,नगरपंचायतला स्वतंत्र इमारत, नाट्यगृह,बाजार समिती आवारात सुलभ शौचालय व रस्त्याकडेला गटार व्यवस्था, शहरात बगीचा यांचा अभाव आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन

भुईकोट किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन सुरू आहे. हे स्मारक झाल्यास कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव मिळून येथील व्यापारात वाढीला चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.