कर्नाटकातल्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही

परवानगी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांना दिला आहे.
कर्नाटकातल्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही
Updated on
Summary

कोगनोळी : 'कर्नाटक सरकारचं (katnataka government) करायचं काय, खाली डोके वर पाय' अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्या (shiv sena) वतीने गुरूवारी (५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी (kognoli check post) येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर RT-PCR ची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक (maharashtra-karnataka boarder) सीमाभागातील नागरिकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात शिवसेनेकडून ही धडक मारण्यात आली.

आज सकाळी दहा वाजता कागल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने शिवसैनिक दूधगंगा नदीजवळ आले. या ठिकाणी असणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावर आल्यानंतर त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट झाली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनातून नेले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

कर्नाटकातल्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही
पालिका कर्मचाऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे म्हणाले, 'कर्नाटक शासनाने दूधगंगा नदीवर चुकीच्या पद्धतीने हा सीमा तपासणी नाका सुरू केला आहे. कर्नाटकालगत असणाऱ्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, उत्तूर, चंदगड, आजरा, वंदूर, करनूर, सुळकुड गावाला जाणाऱ्या प्रवाशांना याठिकाणी अडवण्यात येत आहे. त्यामुळे या लोकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी कर्नाटक शासनाने सीमा तपासणी नाका हा तवंदी येथे सुरू करावा. महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांना सोडण्याची व्यवस्था करावी.'

चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक यांना रास्ता रोकोची माहिती देण्याती आली. सीमावर्ती महाराष्ट्रातील लोकांना जोपर्यंत सोडले जात नाही, तोपर्यंत रस्ता सुरू केला जाणार नाही, असे सांगण्यात आले. पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक म्हणाले, रास्तारोको व मागणीबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत.' यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांना अडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिस व शिवसैनिक यांच्यात किरकोळ झटापट झाली. तणाव न वाढण्यासाठी शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच महामार्ग सुरू करून दळणवळण सुरळीत केले.

कर्नाटकातल्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही
पुरात उरलासुरली आशाही भुईसपाट; 'तेंडल्या' टीमवर अस्मानी संकट

मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, अशोक पाटील, मंजीत माने, संदीप पाटील, प्रतीक क्षीरसागर, विद्या गिरी, दीपाली घोरपडे, पवन पाटील, वैभव आडके, बाबासाहेब शेवाळे, दिनकर लगारे, राहुल टिकले यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय एस. आय. टोलगी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने डीवायएसपी आर. आर. पाटील, पीएसआय दत्तात्रय नाळे, पीआय शशिकांत पाटोळे, एपीआय दीपक वाघचौरे, पीएसआय प्रभाकर पुजारी, एपीआय कविता नाईक यांच्यासह पोलिस तैनात करण्यात आले होते.

शिवसेनेच्या धडकेची सर्वत्र चर्चा

कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआर रिपार्टची सक्ती केल्याने सीमाभागातील नागरिकांची गोची झाली आहे. हा अन्याय मोडून काढण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शिवसैनिकांनी गुरूवारी सकाळीच कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला धडक दिली. त्याची चर्चा संपूर्ण सीमाभागात दिवसभर सुरू होती.

कर्नाटकातल्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही
जातीचा उंबरठा ओलांडून तब्बल 208 जोडपी विवाहबंधनात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()