Car Accident : जत-जांबोटी महामार्गावर भरधाव वेगाने येणारी कार गाडी झाडावर आदळून सहा जण ठार

खानापूर तालुक्यात गुरुवारी एका अपघातात सहाजण ठार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यात पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे.
Jat-Jamboti highway Belgaum
Jat-Jamboti highway Belgaumesakal
Updated on
Summary

मोटारसायकलवरील मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थरोळ्यात पडले होते; तर मोटारीतील मृतदेह बाहेर काढण्यास मोठे प्रयत्न करावे लागले.

रायबाग : दोन दुचाकींना उडवून भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्याकडेला असलेल्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर एकजण जखमी झाला. हा अपघात जत-जांबोटी राज्य महामार्गावर (Jat-Jamboti Highway) मुगळखोडजवळ (ता. रायबाग) शुक्रवारी (ता. २३) संध्याकाळी झाला. बेळगाव (Belgaum) जिल्ह्यात गुरुवारी खानापूर तालुक्यात गुरुवारी (ता. २२) एका अपघातात सहाजण ठार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यात पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे.

एकनाथ भीमाप्पा पडतारी (वय २२, रा. कंकनवाडी, ता. रायबाग), मल्लिकार्जुन रामाप्पा मरेठे (१६), आकाश रामाप्पा मरेठे (१४), लक्ष्मी रामाप्पा मरेठे (१९, रा. गुर्लापूर, ता. मुडलगी), नागाप्पा लक्ष्मण यादवन्नावर (४८, रा. मुगळखोड, ता. रायबाग), हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ (४२, रा. दुरदुंडी, ता. मुडलगी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत; तर बाळानंद परसाप्पा माळगी (३७, रा. गोकाक) असे जखमीचे नाव आहे.

Jat-Jamboti highway Belgaum
Loksabha Election : माढा, सातारा लोकसभेचा खासदार कोण होणार? आमदार गोरेंनी केला भाजपच्या विजयाचा दावा

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून (Police) मिळालेली माहिती अशी, जत-जांबोटी रस्त्यावर मुगळखोडजवळ बसवनगर परिसरात कालव्याजवळ संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली. जत-जांबोटी हा राज्य मार्ग असून दुपदरी आहे. या रस्त्यावर भरधाव मोटार येत होती. यावेळी एक दुचाकीवरून दोघेजण गोकाककडे, तर दुसऱ्या दुचाकीवरून एकजण तेरदाळहून मुगळखोडकडे येत होता. यावेळी गुर्लापूरहून मुगळखोडकडे मोटार येत होती. मोटारीत चौघेजण होते.

भरधाव मोटारीने एका दुचाकीला पाठीमागून व दुसऱ्या दुचाकीला समोरून जोराने धडक दिली. यामध्ये दोन्ही दुचाकींवरील तिघेही फरफटत जाऊन रस्त्यावर आदळले. यानंतर मोटार थेट रस्त्याकडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एका दुचाकीवरून मुगळखोडकडे येणारे यादवन्नावर हे जागीच ठार झाले. त्यांची दुचाकी बाजाराच्या पिशवीसह रस्त्यावर पडली व मृतदेह रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. दुसऱ्या दुचाकीवरून हारूगेरीलहून गोकाककडे निघालेल्या दोघांपैकी मल्यागोळ हे जागीच ठार झाले, तर सहकारी माळगी हे गंभीर जखमी झाले. मल्यागोळ यांचाही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता.

Jat-Jamboti highway Belgaum
'चिकोडीतून प्रियंका जारकीहोळी नाही, तर नव्या चेहऱ्याला संधी देणार'; पालकमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

माळगी यांना गोकाकला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मोटार झाडावर आदळल्याने त्यामधील मरेठे कुटुंबातील तिघे व चालक पडतारी हे चौघेही ठार झाले. मरेठे हे कुटुंब कशासाठी व कुठे जात होते, याची माहिती पोलिसांना मिळायची होती. मात्र, नावावरून एकाच कुटुंबातील तिघे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी, अथणीचे पोलिस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारूगेरी पोलिस ठाण्याचे मंडल पोलिस निरीक्षक रवीचंद्रन एफ., अथणीचे मंडल पोलिस निरीक्षक रवींद्र नाईकवाडी, हारूगेरीचे उपनिरीक्षक गिरिमल उप्पार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हारूगेरी सरकारी दवाखान्यात शवचिकित्सा करून मृतदेह रात्री नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

Jat-Jamboti highway Belgaum
वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ

मोटारीचा चक्काचूर

दोन दुचाकीवाल्यांना धडकून झाडावर आदळल्याने मोटारीचा चक्काचूर झाला होता. ही मोटार कोणती होती हेही घटनास्थळी समजण्यासारखी स्थिती नव्हती. मोटार जोराने आदळल्याने मृतदेह चिरडून आतमध्ये अडकले होते. पोलिस व स्थानिकांनी प्रयत्न करून मोटारीतील मृतदेह बाहेर काढले.

मृतदेह व वाहने विखुरलेली

शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. नेमके कशाचा अपघात झाला याची माहिती प्रत्यक्ष पाहूनही येत नव्हती. मोटार झाडावर जाऊन चक्काचूर झालेली व दोन दुचाकी इतरत्र पडलेल्या होत्या. मोटारसायकलवरील मृतदेह रस्त्यावर रक्ताच्या थरोळ्यात पडले होते; तर मोटारीतील मृतदेह बाहेर काढण्यास मोठे प्रयत्न करावे लागले. रस्ता दुपदरी असल्याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Jat-Jamboti highway Belgaum
Koyna Dam : 1967 च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? काय आहे कारण?

शिक्षकाचा मृत्यू चटका लावणारा

एका दुचाकीवरून दोघे शिक्षक रोज हारूगेरीहून गोकाकडे ये-जा करत असत. या अपघातात मोटारीने त्यांच्याही दुचाकीला धडक दिल्याने त्यातील हनमंत मल्लाप्पा मल्यागोळ हे ठार झाले, तर सहकारी शिक्षक बाळानंद परसाप्पा माळगी हे जखमी आहेत. प्रत्येक शनिवारी सकाळची शाळा असल्याने हे दोघे शिक्षक शुक्रवारी शाळेमध्ये वस्ती राहत होते. पण, यावेळी शुक्रवारी (ता. २३) त्यांनी गावाकडे जाण्याचा बेत आखला आणि काळाने मल्यागोळ यांचा जीव हिरावून घेतला. यावेळी शिक्षकांनीही घटनास्थळी व नंतर दवाखान्यासमोर गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.