कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने परिसरातील लोक दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या चर्चेमुळे लोक शेतात जायला घाबरत आहेत.
बहे - कृष्णाकाठाला आधीच सापांची (Snake) भीती (Fear) आणि आता बहे परिसरात बिबट्याचा (Leopard) वावर असल्याच्या चर्चेने परिसरातील लोक दहशतीखाली (Panic) आहेत. बिबट्याच्या चर्चेमुळे लोक शेतात (Farmer) जायला घाबरत आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांत कृष्णा नदीला आलेला महापूर, अतिवृष्टीनंतर नदीकाठच्या गावात, शिवारात सापांचे प्रमाण वाढले आहे. महापुरात वाहून आलेल्या सापांचा लोकवस्तीत तसेच शिवारात वावर वाढल्याने लोक आधीच काहीशा भीतीखाली राहत आहेत. साप, नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, टोळ या जातीचे साप दिसून येत आहेत. बहे, हुबालवाडी, खरातवाडी, तांबवे आदी नदीकाठच्या गावांत सापांचा वावर वाढला आहे. घोणस जातीचे साप परिसरात तसेच शेत शिवारात फारसे दिसत नव्हते. पण महापुरानंतर हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. नागांचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून बहे परिसरातील नेर्ले रस्ता, तांबवे रस्ता, पेट्रोल पंप, मठी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आहे. बहे येथील काही ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिल्याचे सांगितले जाते. कृष्णाकाठाला आधीच सापांची भीती आणि आता बहे परिसरात बिबट्याचा वावर यामुळे शेतकरी तसेच मजूरवर्ग शेतात जायला धजावत नाही.
दररोज ‘मॉर्निंग वॉक’ साठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, बिबट्याच्या परिसरातील वावराच्या चर्चेने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. बिबट्याच्या वावराची चर्चा मात्र जोरात सुरू आहे. कृष्णाकाठाला सध्या ऊसतोडी सुरू आहेत. ऊसपट्ट्यातच बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. महावितरण कंपनीने शेती पंपांना रात्रीच वीज दिल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्रीच शेतात जावे लागत आहे. बिबट्याच्या वावराच्या चर्चेने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत सापांचे प्रमाण कमी झाल्याचे सर्पमित्र बजरंग शिरतोडे यांनी सांगितले. त्यातल्या त्यात ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.
सतर्क रहावे, सुरक्षेची काळजी घ्यावी
शेतकरी व ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व सतर्क रहावे, सुरक्षेची काळजी घ्यावी, रात्री-अपरात्री व एकटे शेतात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. ग्रामपंचायतीने बिबट्याच्या वावराबाबत वनविभागालाही कळविले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.