सोलापूर महापालिकेतील "त्या' वसुलदारांचे धाबे दणाणले 

सोलापूर महापालिकेतील "त्या' वसुलदारांचे धाबे दणाणले 
Updated on

सोलापूर : मिळकत कर वसूल करूनही त्याची पावती न देणाऱ्या कारकुनांचे धाबे दणाणले आहेत. पंधरा पंधरा वर्षे पैसे घेऊन जातात आणि पावती देत नाहीत या आशयाची बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळी एकच खळबळ उडाली. विशेषतः हद्दवाढ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल दिसून आली. कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या या कर्मचाऱ्यांबाबत पदाधिकारी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, महापालिकेने थकबाकी वसुली तीव्र केली असून, मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे ही प्रक्रिया सुरु केली आहे. 

नियमित मिळकतदारांकडून संताप 
दरवर्षी पैसे भरूनही पावती मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः हद्दवाढ भागातील मिळकतदारांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. असाच एका मिळकतदाराने पावती न मिळाल्याची तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. एकीकडे छोटी थकबाकी असलेल्या मिळकतदारांचे नळजोड तोडणे किंवा त्यांच्या मालमत्ता जप्त करणे ही कारवाई केली जात असताना, महापालिकेतीलच कर्मचारी संगनमताने मिळकत करासंदर्भात असा प्रकार करीत असल्याचे उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. 

लखपती थकबाकीदारांचे डिजीटल 
गेल्या 14-15 वर्षांपासून मिळकतींचे रिव्हीजन झाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. अनेक झोपड्यांच्या ठिकाणी मोठ्या इमारती उभारल्या आहेत, मात्र त्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत. हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी इमारती, व्यावसायिक संकुल उभारले आहेत, त्यापैकी किती मिळकतींची नोंद महापालिकेच्या दफ्तरी आहे हा संशोधनाचा विषय आहे. जीआयएस प्रणालीद्वारे मिळकतींची नोंद आता होत असली तरी, ती प्रत्यक्ष कागदावर आल्यावर हा आकडा किती मोठा असेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे. थकबाकीच्या दंडामध्ये आयुक्तांनी तब्बल 75 टक्के सवलत दिली, तरीही थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू लागलेला नाही. त्यामुळे लवकरच आता लखपती थकबाकीदारांचे डिजीटल ते रहात असलेल्या भागात झळकणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.