सोलापूर जिल्ह्यात १० हजार मते ‘नोटा’ला! काडादी, नरोटे, तौफिक शेख, आडम मास्तरांसह ‘या’ १५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; ५ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते

जिल्ह्यातील ११ मतदारसंघात ९,८९६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. नोटाचा वापर करणारे सर्वात जास्त ११०६ मतदार सांगोला मतदारसंघात आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १५९ जणांचे झिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना एकूण वैध मतांच्या एक षष्टांश मते मिळविता आलेली नाहीत.
solapur
cashsakal
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील ११ मतदारसंघात एकूण ९ हजार ८९६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आहे. नोटाचा वापर करणारे सर्वात जास्त ११०६ मतदार सांगोला मतदारसंघात असून, सर्वात कमी ५५७ मते शहर मध्य मतदारसंघात आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल १५९ जणांचे झिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना एकूण वैध मतांच्या एक षष्टांश मते मिळविता आलेली नाहीत.

आपल्या पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्यास नोटा पर्यायाचा वापर करता येता. २०११ पासून ईव्हीएम मशिनवर सर्वात नोटाचे बटन उपलब्ध करून दिल्याने अनेक उमेदवार नोटाचा वापर करत आहेत. यंदाच्या निवडणुकी नोटा पर्याय वापर करण्याचे प्रमाण घटले आहे. २०१९ च्या निवडणुकीत १२ हजार ९४४ मतदारांनी नोट पर्याय वापरला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वात जास्त वापर झालेल्या सांगोला मततदारसंघात २०१९ फक्त ७०० जणांनी नोटा पर्याय वापरला होता. तर माढा मतदारसंघात नोटाला शून्य मते मिळाली होती.

अनेक उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही मिळाली कमी मते

जिल्ह्यातील अनेक अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. शहर उत्तर मतदारसंघातील माजी महापौर शोभा बनशेट्टी यांना ५५४ मते मिळाली आहेत तर याच मतदारसंघात नोटाला ७१६ मते मिळाली आहेत. शहर मध्य मतदारसंघात ५५७ मते नोटाला मिळाली आहेत तर एम. डी. सैफन शेख (अपक्ष) यांना ५११, खिजर पिरजादे (एआयएफबी) यांना २४४, डॉ. संदीप आडके (अपक्ष) २३०, रविकांत बनसोडे (आरपीआय ए) १४१ यांच्यासह अनेक अपक्षांना नोटापेक्षा कमी मतदान आहे.

मतदारसंघनिहाय नोटाला मिळालेली मते

  • मतदारसंघ ‘नोटा’ची मते

  • मोहोळ २०४७

  • पंढरपूर ९२४

  • करमाळा ९९५

  • अक्कलकोट ११०४

  • बार्शी ६९७

  • शहर उत्तर ७१६

  • शहर मध्य ५५७

  • शहर दक्षिण ८२६

  • सांगोला ११०६

  • माढा ९२४

जिल्ह्यातील १५९ जणांचे सुमारे १२ लाख रुपये शासनजमा

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील १८४ उमेदवारांपैकी १५९ जणांचे डिपॉझिट जप्त होणार असून यामुळे सुमार १२ लाख रुपये शासन जमा होणार आहेत. यामध्ये शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे, माकपचे उमेदवार नरसय्या आडम तसेच सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना खुल्या वर्गातील उमेदवाराला दहा हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना पाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. एकूण वैध ठरलेल्या मतांच्या एक षष्टांश मते ज्या उमेदवारांना मिळाणार नाहीत त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे १५९ उमेदवारांना बसणार आहे. ही अनामत रक्कम सुमारे बारा लाख रुपये इतकी आहे.

विजयाच्या दावेदारांनाही फटका

मध्य मतदारसंघातील माकपचे उमेदवार नरसय्या आडम हे महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. त्यांना अखेरपर्यंत महाविकास आघाडीचे तिकिट मिळाले नाही. यामुळे ते माकप पक्षाच्या विळा हातोडा चिन्हावरून निवडणूक रिंगणात होते. नरसय्या आडम यांना ६७४९ तर या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांना १६०९२ मते मिळाली आहेत. मध्य मतदारसंघात डिपॉजिट वाचविण्यासाठी किमान ३३३८१ मते मिळणे आवश्यक आहे. तर शहर दक्षिण मध्ये ३७२७० मते आवश्यक आहेत. मात्र अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना१८७४७ मते मिळाली आहेत. यामुळे या तिघांसह १५९ जणांचे डिपॉजिट जप्त होणार आहे.

अमर पाटील बचावले

सोलापूर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे निवडणूक लढवित होते. या मतदारसंघात डिपॉझिट वाचण्यासाठी ३७२७० मते आवश्यक आहेत. याच मतदारसंघात एनवेळी धर्मराज काडादी यांना काँग्रेसने पुरस्कृत केले. तरीदेखील अमर पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची ३९८०५ मते मिळाली आहेत. अवघ्या २५३५ मतांमुळे त्यांचे डिपॉझिट वाचले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.