सोलापूर : परदेशातून आलेले ११५ पाहुणे निगेटिव्ह

दीड महिन्यात १४१ लोक दाखल; २६ जणांचा अद्याप लागेना शोध
solapur
solapuresakal
Updated on

सोलापूर : गेल्या दीड महिन्यात विविध वीस देशातून १४१ नागरिक शहरात आले. आतापर्यंत यातील ११५ परदेशी पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह (RTPCR TEST NEGATIVE)आली आहे. तर उर्वरित २६ जणांचा शोध अद्याप लागला नाही. त्यातच गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधितांची(corona patients) संख्या एक हजारावर गेली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची ओमिक्रॉन चाचणी(omicron test) करण्यात येत असून मागील पंधरा दिवसात महापालिकेने(solapur corporation) ५७८ रुग्णांचे नमुने सिव्हिलला तपासणीसाठी पाठविले आहेत.

solapur
कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या(omicron varient) पार्श्‍वभूमीवर शासन आदेशानुसार परदेशातून आणि इतर राज्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी महापालिकेकडून करण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेला १ डिसेंबरपासून सुरवात झाली. दीड महिन्यात शासनाकडून महापालिकेला (solapur corporation)यूएसए, यूके, सौदी अरेबिया, ऑस्ट्रोलिया, कतार, जर्मनी, कॅनडा इतर देशांतून १४१ नागरिक शहरात आल्याची यादी प्राप्त झाली. कोरोनाच्या कमी- अधिक लक्षणावरून ओमिक्रॉनची तपासणी होत आहे. अपुऱ्या माहितीअभावी २६ परदेशी पाहुण्यांची माहिती मिळाली नसल्याने त्यांची तपासणी अद्याप झाली नाही. तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून शासनाने अनेक निर्बंध घातले. परंतु हे सर्व निर्बंध केवळ दंडात्मक कारवाईपुरतेच मर्यादित राहिले. शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. महापालिकेने लसीकरणाची(vaccination) गती वाढविली. कोरोना चाचणी वाढविले. तरीदेखील संसर्गाचा चढता आलेख कायम आहे. मागील आठ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

solapur
सोलापूर : शेतकऱ्यांची बहुपयोगी काठी आता राज्यस्तरावर
  1. एकूण परदेशी पाहुणे - १४१

  2. १ जानेवारीपासूनच्या एकूण चाचण्या -११२२८

  3. रॅपिड अँटीजेन चाचण्या -५९२४

  4. आरटीपीसीआर चाचण्या -५३०४

  5. निगेटिव्ह अहवाल -१०२०४

  6. कोरानाबाधितांची संख्या- १०२७

  7. ओमिक्रॉनची तपासणी- ५७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.