Solapur News : मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी 145 अर्ज

विद्यमान सभापती सोमनाथ आवताडे व जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी व्यापारी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल
145 applications for 18 seats of Mangalvedha Agricultural Produce Market Committee
145 applications for 18 seats of Mangalvedha Agricultural Produce Market Committeeesakal
Updated on

मंगळवेढा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागेसाठी तब्बल 145 उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान सभापती सोमनाथ आवताडे व जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांनी व्यापारी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यापूर्वीच्या निवडणुकीत 18 जागेवर जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांचे नेतृत्वाखालील सर्वच संचालक विजयी झाले. पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून त्यांनी त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले त्यांच्या गटाचे स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल झाले तर भाजप आ समाधान आवताडे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन जे आपल्याबरोबर सोबत येतील त्यांना बरोबर घेऊन बाजार समितीची निवडणूक लढवण्याची जाहीर करून त्यांच्या समर्थकाने देखील आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

तालुक्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच मा. आ. प्रशांत परिचारक व राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या समर्थकांनी तयार केलेल्या समविचारी आघाडीच्या समर्थकांनी देखील दामाजी कारखान्यातील यशामुळे उमेदवारी अर्ज दाखल केले. संस्था मतदारसंघात 46 उमेदवारी अर्ज, महिला जागेसाठी 13, इतर मागासवर्गीय 13, भटक्या विमुक्त जाती 12 असे 11 जागेसाठी एकूण 84 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

ग्रामपंचायत प्रवर्गामध्ये 27 जणांनी उमेदवारी अर्ज,ग्रामपंचायत अनुसूचित जाती मध्ये 15 जणांनी तर आर्थिक दुर्बल मध्ये 8 असे एकूण 4 जागेसाठी 50 उमेदवारी अर्ज दाखल झाले. व्यापारी मतदारसंघात 2 जागेसाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज तर हमाल तोलारच्या 1 जागेसाठी चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

संस्था मतदार संघामध्ये खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, दामाजी कारखान्याची माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, अजित जगताप, विजय माने,दामाजीचे संचालक दयानंद सोनगे,रामेश्वर मासाळ,विष्णुपंत अवताडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे, चंद्रकांत गोडसे, प्रकाश जुंधळे असे प्रमुख उमेदवारी अर्ज दाखल केले,

महिला प्रवर्गामध्ये संगीता कट्टे व सुमया तांबोळी यांच्यासह तेरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, ग्रामपंचायत विभागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार,सोमनाथ माळी, शिवाजी पटाप,सहदेव लवटे, जगन्नाथ रेवे,महादेव लवटे, सचिन शिवशरण, प्रवीण खवतोडे, हौसाप्पा शेंवडे, मिलिंद डावरे,असे उमेदवारी अर्ज दाखल झाले. याशिवाय इतर इच्छुकानी आपापल्या नेत्याच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत छाणणी नंतर या संस्थेच्या आखाड्यात किती उमेदवार राहतात त्यानंतर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.