Barshi Corona Update : बार्शी शहरात नवे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्य विभाग अलर्ट; प्रशासनाची धावपळ, इतरांची तपासणी सुरू
2 corona affected patients found barshi health center alert
2 corona affected patients found barshi health center alertsakal
Updated on

बार्शी : शहरातील सुभाषनगर आणि चोरमुले प्लॉटमध्ये राहणाऱ्या महिला त्रास जाणवल्याने शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

मागील एक महिन्यांपासून शासनाने शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन टेस्ट करण्याचे सुरवात केली आहे. ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने दोन महिला शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी त्यांची कोरोना टेस्ट केली असता शनिवारी (ता.६) त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. दरम्यान, शनिवार व रविवारी आशावर्कर, आरोग्य सहाय्यक, परिचारिका पथक संबंधित भागामध्ये तपासणीसाठी पोचले असून ज्या महिलेची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

ती नुकतीच प्रसूती झाली आहे. त्यांची तपासणी केली.कुटुंबातील व्यक्ती, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची, शेजारी राहणाऱ्यांची तपासणी करण्यात येत असून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना पंधरा दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

बार्शी शहरामध्ये दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. मागील महिन्यात तालुक्यात १०६ आरटीपीसीआर तर ११२ रॅपिड अँटिजन तपासण्या करण्यात आल्या होत्या. दोन पॉझिटिव्ह आल्या असून बाकी सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्या आहेत.

- डॉ. अनिता बांगर, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी

ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी सुरू आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, बोलताना सामाजिक अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ धुवावेत, त्रास जाणवत असल्यास तत्काळ रुग्णांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

- डॉ. शीतल बोपलकर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, बार्शी

आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम रुग्ण आढळलेल्या प्रभागात कार्यरत आहे. त्या भागातील इतर नागरिकांच्या, संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या तपासण्या करण्यात येतील.

- बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी, नगरपरिषद, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.